Double Pregnancy: काय सांगता? गर्भात आधीच जुळी मुले असताना महिला दुसऱ्यांदा झाली गर्भवती; जाणून घ्या काय असते Superfetation
Pregnant women | (Photo Credit: Pixabay)

गरोदर स्त्रिया (Pregnant Women) आणि त्यांना होणाऱ्या मुलांबाबत याआधी अनेक आश्चर्यकारक घटना समोर आल्या आहेत. आता आधीच गर्भवती असलेली महिला अजून एकदा गरोदर (Double Pregnancy) असल्याचे आढळून आले आहे. या आईच्या उदरात आधीपासूनच जुळे मुले आहेत आणि आता तिच्या गर्भात तिसरे मूलही आले आहे. आधीच गर्भाशयात जन्मलेली दोन्ही मुले तिसर्‍या मुलापेक्षा 10 आणि 11 दिवस मोठी आहेत. आता आपल्याला तिसरे मुल होणार असल्याचे समजल्यावर ही महिला फार आनंदित झाली आहे. आपल्या तिन्ही मुलांना एकत्र जन्म देण्यास ती उत्सुक आहे.

ही गर्भवती आई TikTok वर @theblondebunny1 या खात्यावर आपल्या डबल प्रेग्नन्सीच्या अविश्वसनीय प्रवासाचा प्रत्येक क्षण शेअर करत आहे. या महिलेची स्थिती वैद्यकीय भाषेत सुपरफेटेशन (Superfetation) म्हणून ओळखली जाते. जेव्हा दुसरे एग शुक्राणूद्वारे फलित करून गर्भाशयात, पहिल्या गर्भानंतर काही दिवसांनी रोपण केले जाते, तेव्हा 'दुहेरी गर्भधारणा' होते. हे सुपरफेटेशन असून Twin Absorption किंवा कुपोषित मुल नाही हे तपासण्यासाठी डॉक्टर दर दोन आठवड्यांनी या महिलेची अल्ट्रासाऊंड करत आहेत.

मिशिगनचे प्रसूतिशास्त्रज्ञ कॉनी हेडमार्क म्हणतात, 'गर्भधारणा हार्मोन्स सहसा स्त्रीची पुनरुत्पादक प्रणाली पूर्णपणे बंद करते, ज्यामुळे गर्भावस्थादरम्यान ओव्हुलेशन होण्याची शक्यता दूर होते. यामुळेच सुपरफिटनेस एक अनोखी घटना मानली जाते.' या महिलेने एका व्हिडिओमध्ये असेही सांगितले आहे की, तिने नैसर्गिकरित्या गर्भधारणा केली आहे यासाठी कोणतीही जननशक्ती औषधे घेतली नाहीत. महिलेने पुढे सांगितले की तिने महिन्यातून दोनदा Hyper Ovulation आणि ओव्हुलेट केले आहे, म्हणून जुळी मुले आधीच गर्भात असताना ती पुन्हा गरोदर राहिली. तसेच गर्भधारणा हार्मोन्स ओव्हुलेशन रोखतात, परंतु या महिलेच्या बाबतीत असे घडले नाही.

दरम्यान, जर आधीच गर्भवती असलेल्या महिलेने पुन्हा गर्भधारणा केली तर गर्भाशयात जन्मलेली दोन मुले एकाच वेळी जन्माला येतील, परंतु त्यांच्या जन्मामध्ये किती अंतर असेल हे कोणत्या गर्भाचा विकास कधी सुरु झाला आहे व गर्भाचा आकार यावर अवलंबून असेल.