बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. तिचे हॉट आणि बोल्ड फोटोजची (Bold Photos) सोशल मिडियावर बरीच चर्चा असते. तिच्या सौंदर्याचे आणि फिटनेसचे असंख्य दिवाने आहेत. त्यामुळे सोशल मिडियावर स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंट तिचा एक हॉट फोटो शेअर केला आहे. यात तिचा बोल्ड अंदाज पाहून सर्वजण घायाळ झाले आहेत. या फोटोमध्ये पाण्यात भिजून चिंब झालेले तिचे केस आणि ते उडवताना आलेला ग्लॅमरस फोटो पाहून सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत.
या फोटोमध्ये दिशा पटानी पाण्यात मनसोक्त डुंबताना दिसत आहे. दिशा पटाणीने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, जो उगवत्या सूर्यासह घेण्यात आला आहे. या फोटोमध्ये दिशा पाण्यातून तिचे केस हटके स्टाईलने उडवताना दिसत आहे. हा फोटो सावलीच्या शैलीत क्लिक केला गेला आहे. फोटोमध्ये दिशा बिकिनी अवतारामध्ये दिसली आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा चेहरा स्पष्ट दिसत नसला तरी, तिच्या या फोटोने सोशल मीडियाचा पार चांगलाच वाढवला आहे.हेदेखील वाचा- Disha Patani चा Back Flip व्हिडिओ व्हायरल; स्टंटबाजीसाठी चाहत्यांकडून कौतुक
View this post on Instagram
हा फोटो शेअर करताना दिशाने लिहिले की, हा तिचा जुना फोटो आहे. या फोटोला 14 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
काही दिवसांपूर्वी दिशा पटानीने बॅक फ्लिप मारतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, काश हे बटरप्रमाणे फिल होत असते. या व्हिडिओ पाहून चाहत्यांसोबतच दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा यांनी देखील यावर आश्चर्य व्यक्त केले आहे.