Old review of Naya Nagar Police Station (Photo Credits: Google)

आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. सध्या मुंबईतील (Mumbai) मीरा भाईंदर (Mira-Bhayandar) येथील नाया नगर पोलिस स्टेशनबद्दलचा (Naya Nagar Police Station) गुगल रिव्ह्यू (Google Review) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा रिव्ह्यू 5 महिन्यापूर्वी मन्सूरी अवेश (Mansuri Avesh) या इसमाने लिहिला आहे. अटक झाल्यानंतर नाया नगर पोलिस स्टेशनमध्ये मला चांगली वागणूक मिळाली, असे त्याने रिव्ह्यूमध्ये म्हटले आहे. नाया नगर पोलिस स्टेशन अधिकाऱ्यांकडून पुन्हा अटक होऊ दे, अशी इच्छा देखील त्याने व्यक्त केली आहे.

मला नाया नगर पोलिस स्टेशनमध्ये अटक करुन नेण्यात आले होते. तेथील तुरुंगवास खूप चांगला आहे. तुरुंगात पुरेशी जागा असून स्वच्छता देखील राखण्यात आली आहे. तेथील जेवण देखील चांगले आहे. फक्त हातकड्या थोड्या टाईट होत्या. तिथल्या अधिकाऱ्यांची वर्तवणूक देखील चांगली आहे. जर मला पुन्हा संधी मिळाली तर मी नक्की तिथे जाईन, असे आपल्या पोलिस स्टेशनच्या रिव्ह्यू मध्ये अवेश यांनी लिहिले.

आयपीएस अधिकारी संतोष सिंह यांनी ट्विटरवर हा रिव्ह्यू शेअर केल्यानंतर व्हायरल झाला. या ट्विटमध्ये त्यांनी काही वरिष्ठ पोलिस अधिकारी, आयएएस अधिकारी आणि पत्रकारांना टॅग करत त्यांना याबद्दलचे मत विचारले.

Santosh Singh Tweet:

नाया नगर पोलिस स्टेशनच्या गुगल रिव्ह्यूमध्ये खूप जणांनी चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. अपेक्षेपेक्षा जेल खूप चांगले होते आणि त्यात राजमा-भाताचा मेन्यू जेवणात होता. इथे खूप चांगली लोक आहेत. एकाने तर माझ्यासोबत सिग्रेट देखील शेअर केली, असे आर्यन नामक व्यक्तीने रिव्ह्यू मध्ये लिहिले आहे.

या व्यक्तींना खरंच अटक झाली होती आणि त्यांना तुरुंगवास भोगावे लागला होता, याबाबत अजून अस्पष्टता आहे. नाया नगरमधील सरुपी आयेशा को. सो. जवळ हे पोलिस स्टेशन स्थित आहे. या व्हायरल रिव्ह्यूमुळे अटक केलेल्यांना कशी वागणूक द्यावी याबद्दल संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत.