Crabs Viral Video

Crabs Viral Video: विमानतळावर अनेक प्रवासी सामान घेऊन प्रवास करतात, पण अनेक जण गुपचूप काही गोष्टी सोबत नेण्याचा प्रयत्न करतात, ज्यांना परवानगी नसते. अशा घटना जगात अनेकदा समोर येतात, जेव्हा काही लोक विमानतळावरून साप, विंचू अशा अनेक प्राण्यांची बेकायदा वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात, पण पकडले जातात. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विमानतळावर खेकड्यांची फौज दिसत आहे. हे खेकडे एका प्रवाशाच्या बॅगमधून बाहेर आले आणि विमानतळाच्या लगेज कन्व्हेअर बेल्टवर पसरले.

@AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "खेकड्यांसोबत कोण प्रवास करतो ? हा व्हिडिओ शेअर झाल्यापासून आतापर्यंत 389.3 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. विमानतळावर शेकडो खेकडे पाहून लोकांना घाम फुटला होता.

विमानतळावर दिसली खेकड्यांची फौज

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विमानतळाच्या लगेज कन्व्हेअर बेल्टवर अनेक खेकडे दिसत असून ते सर्व जिवंत असल्याचे दिसत आहे. यातील अनेक खेकडे कन्व्हेअर बेल्टच्या बाजूने फिरताना दिसतात, तर अनेक जण खाली उतरून इकडे तिकडे जातात. इतके खेकडे पाहून लोकांना कन्व्हेअर बेल्टमधून आपले सामान उतरविणे अवघड जात होते. मात्र, या घटनेचे ठिकाण अद्याप समोर आलेले नाही.