जगभरात थैमान घालणारं कोरोना व्हायरसचं संकट आता महाराष्ट्र राज्यातही शिरले आहे. सध्या राज्यात कोरोनाचे 116 रूग्ण आहेत. आज पासून 14 एप्रिल पर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र इतक्या कठीण प्रसंगामध्येही नर्स, डॉक्टर्स सह पोलिस आपला जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरसचा धोका पत्करत आहेत. अशावेळेस त्यांचे कुटुंबीय किती मानसिक ताणतणावामधून जात असतील याचा अनेकांना थांगपत्ता देखील नसेल. सध्या सोशल मीडियावर अशा एका मुंबई पोलिस कर्मचार्याच्या घरातील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिस कर्मचार्याचा चिमुकला वडील घराबाहेर पडताना पाहून ओक्साबोक्सी रडत आहे. 'पप्पा बाहेर जाऊ नका ना बाहेर कोरोना आहे.' असा केविलवाणा हट्ट करत असल्याचा व्हिडिओ नेटकरी अनेक भाविक मेसेज सह शेअर करत आहेत. Coronavirus: Janta Curfew च्या वेळी रस्त्यावर उतरून लोकांनी केला होता थाळीनाद; नेटकरी म्हणतात हे तर 'COVIDIOT'; पहा व्हायरल व्हिडीओ.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सार्याच राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि दिग्गज मंडळी, राजकारणी, तज्ञ सध्या भारतातील नागरिकांना हात जोडून अनावश्यक गर्दी टाळण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान तरीही संचारबंदीचं उल्लंघन करणार्यांसाठी किमान अशा व्हिडिओमुळे कोरोना व्हायरस संकटांचं गांभीर्य समजेल का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. Total Lockdown in India: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवस लॉकडाऊन, 'या' सुविधा राहणार सुरू; जाणून घ्या संपूर्ण यादी.
'पापा बाहेर कोरोना आहे'
कोरोनाव्हायरसमुळे आलेल्या कठीण परिस्थितीत आमच्या अधिकाऱ्यांची 'कुटुंबा पुढे कर्तव्य' अशी असलेली भावना केवळ आवश्यक सेवांमध्ये काम करणार्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला प्रेरणा देते #WarAgainstVirus #MaharashtraPolice pic.twitter.com/erTePHtq0n
— Maharashtra Police (@DGPMaharashtra) March 25, 2020
दरम्यान राज्यात आता कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होऊन ती 116 पर्यंत पोहचली आहे. दरम्यान आज (25 मार्च) सकाळी सांगली येथील इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोना व्हायरसची बाधा झाल्याचं समोर आलं आहे तर आता मुंबई शहरामध्ये 4 नवे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.