Thali bajao gathering (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी सर्वांनी घरात किंवा सुरक्षित ठिकाणी राहावे असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जात आहे, काल 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडून देशवासियांना जनता कर्फ्यू (Janta Curfew) पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. सकाळी 7 ते रात्री 9  या काळात नागरिकांनी कोणत्याच कारणासाठी घराबाहेर पडू नये असे या मध्ये स्पष्ट करण्यात आले होते, या सोबतच संध्याकाळी 5 वाजता सर्वांनी टाळ्या, थाळ्या वाजवून देशभरातील अत्यावश्यक सेवा आणि हॉस्पिटल कर्मचारी, डॉक्टरांचे कौतुक करावे असेही सांगण्यात आले होते. मात्र अशीही काही लोकं आहेत ज्यांनी या कौतुक सोहळ्याला गालबोट लावले आहे. पाच वाजता थाळ्या टाळ्या वाजवण्यासाठी चक्क घरातून बाहेर पडून रस्त्यावर गर्दी केल्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी या महाभागांना COVIDIOT असा हॅशटॅग देऊन सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

शरद पवार, सुप्रिया सुळे, योगी आदित्यनाथ, जेपी नड्डा आदि नेत्यांनीही टाळ्या, थाळ्या, शंख वाजवून मानले अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांचे आभार (Videos)

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडीओज मध्ये लोक सार्वजनिक ठिकाणी जमून अक्षरशः नाचताना, फटाके वाजवताना दिसत आहेत. देशवासियांचा हा उत्साह कितीही स्तुत्य असला तरी या संकटाच्या काळात अनावश्यक किंबहुना धोकादायक आहे असे मत या व्हिडीओजवर व्यक्त केले जात आहे. लोकांनी गर्दी टाळावी या साध्या सल्ल्याचे सुद्धा पालन केले गेले नाही तर अशा कौतुकाचे डॉक्टरना समाधान वाटेल का असे सवालही या व्हिडीओजवर उपस्थित केले जात आहेत. यातील काही व्हिडीओ आता आपण पाहणार आहोत..

पहा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, काल पाच वाजण्यापूर्वी आणि सहाच्या नंतर देशभरात कडेकोट कर्फ्यू पाळण्याचे आदेश होते, यानुसार अनेक ठिकाणी निव्वळ शुकशुकाट होता, लोकांनी दिलेल्या या प्रतिसादाचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे, तर जे लोक अजूनही हा कर्फ्यू गाआंभीर्याने घेत नाहीत त्यांना पुन्हा एकदा विचार करण्याचे आवाहन सुद्धा आज मोदी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून केले. सध्या देशभरात सर्व राज्यात लॉक डाऊनचे आदेश देण्यात आले आहेत.