कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) संपूर्ण मानवजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रत्येक देश त्यावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. या विषाणूवर अजूनही औषध किंवा लसीचा शोध लागला नाही, त्यामुळे या विषाणूची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या अशाच विवंचनेत युरोपियन देश स्पेन (Spain) देखील आहे. या देशातील 80 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. इथल्या बर्याच हॉस्पिटलमध्ये लोकांवर उपचार सुरू आहेत. अशात सध्या स्पेनमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हॉस्पिटलमधील स्टाफने संक्रमित लोकांसाठी ‘ओम’चा (Om Mantra) जप आणि सतनाम वाहे गुरुपाठ (Satnaam Wahe Guru Path) चे पठण केले.
मानव मंगलानी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यात हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी, स्टाफ शिस्तबद्ध पद्धतीने उभे आहेत आणि 'ओम’ मंत्रांसह सतनाम वाहेगुरू'चा पाठ पठन करत आहेत. हा व्हिडिओ स्पेनमधील रूग्णालयाचा असल्याचा दावा मानव मंगलानी यांनी केला आहे. अशाप्रकारे एकीकडे या विषाणूवर विजय प्राप्त करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र झटत असताना, दुसरीकडे मनातील आस्थाही यासाठी मदत करेल या आशेने डॉक्टरांनी हिंदू पद्धतीने पार्थना केली. सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये ओम मंत्राचा जप करण्याचे बरेच विलक्षण फायदे सांगितले आहेत. अनेक प्रसंगी असे दावे केले जातात की. याच्या जपाने बरेच रोग दूर होतात, अनेक अवघड गोष्टी सुलभ होतात. हिंदू धर्माच्या बहुतेक मंत्रांचा उच्चार 'ओम' ने सुरू होतो. त्याचप्रमाणे शीख धर्मातही देवाकडे जाण्याचा मार्ग संगीताद्वारे सांगितला गेला आहे. या धर्मात अर्धनामध्ये 'सतनाम वाहेगुरू' प्रार्थनेस सर्वोपरि दर्जा देण्यात आला आहे. म्हणूंच कोरोना विषाणूशी झुंज देत असलेल्या पेशंटसाठी ही स्पेनमधील डॉक्टरांनी या प्रार्थनेचा आधार घेतला.