Coronavirus Marathi Song (Photo Credits: Youtube)

Coronavirus Marathi Songs: चीनमधून जगभरातील तब्बल 90 हून अधिक देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. दिवसागणित कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढत जाणारी संख्या यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. देशासह राज्यात गंभीर परिस्थिती असताना कोरोनावरील मजेशीर गाणी समोर आली आहेत. ही गाणी ऐकायला मजेशीर असली तरी त्याद्वारे कोरोना व्हायरसचा धोका कसा टाळता येईल, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (कोरोना व्हायरसला घालवण्यासाठी रामदास आठवले यांची हटके घोषणाबाजी)

'असा कसा रोग कोरोना' या गाण्याची सोशल मीडियात सध्या चांगलीच धूम असून रवी वाघमारे हे या गाण्याचे गीतकार असून आहेत. त्यांनीचे हे गाणे गायले आहे. या गाण्याद्वारे त्यांनी कोरोना व्हायरस रोखण्यासाठी काय करायला हवी, कोणती खबरदारी घ्यायला हवी, याची माहिती दिली आहे.

'धुमाकूळ घातलाय भारतात कोरोना व्हायरसनं' असं एक रिमिक्स गाणं देखील सध्या चांगलंच चर्चेत आहे.

कोरोना व्हायरसचा प्रभाव कमी करण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. नागरिकांनी घाबरुन न जाता विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्यांकडून करण्यात आले आहे. तरीही नागरिकांनी गोंधळून न जाता आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.

मराठीतच नाही तर हिंदी भाषेतही कोरोनावर काही गाणी तयार करण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील एका भजनी मंडळाने कोरोनावर एक भजन तयार केले होते. कोरोना व्हायरसची दहशत नागरिकांमध्ये प्रचंड असली तरी यावरील जोक्स, मीम्स आणि मजेशीर गाणी यामुळे वातावरण हलकं फुलकं व्हायला नक्कीच मदत होईल.