Jabalpur: जबलपूरमध्ये टीव्ही डिबेट शोमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; एकमेकांवर फेकल्या खुर्च्या (Watch Video)
Clash between Congress and BJP workers at TV debate show (PC - X/@GoldySrivastav)

Jabalpur: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2-24) पार्श्वभूमीवर देशातील वातावरण चांगलेच तापले आहे. अनेकदा आपण पाहतो की निवडणुकीच्या काळात आपापल्या पक्षांचे समर्थक एकमेकांशी भिडतात. असेच दृश्य जबलपूर (Jabalpur) च्या भंवरतालमध्ये पाहायला मिळाले. येथे एका टीव्ही चर्चेदरम्यान काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले आणि काही वेळातच दोन्ही गटांमध्ये लाथा-बुक्क्या सुरू झाल्या. हा वाद इतका विकोपाला गेला की, लोक जीव वाचवण्यासाठी तेथून पळताना दिसत होते.

या हाणामारीत दोन्ही पक्षांचे अनेक कार्यकर्ते जखमी झाले. काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर हाणामारीचे आरोप केले आहेत. यानंतर रात्री उशिरापर्यंत दोन्ही पक्षांनी तक्रार नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. दोन्ही पक्षांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. (हेही वाचा -BJP Releases Manifesto: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केला जाहीरनामा; पक्षाने महिला, तरुण आणि गरीबांना दिली 'ही' आश्वासने)

पहा व्हिडिओ - 

भारतीय जनता पक्षाचे उत्तर-मध्य आमदार अभिलाष पांडे आणि काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विनय सक्सेना तसेच दोन्ही पक्षांचे अध्यक्ष कार्यकर्ते व समर्थकांसह भंवरताल येथे आयोजित वादविवाद कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, प्रश्नोत्तरांच्या मालिकेदरम्यान, एका काँग्रेस नेत्याने भाजपच्या एका उच्चपदस्थ नेत्याबद्दल काही वैयक्तिक टीका केली.

याला कार्यक्रमात उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला. दोन्ही बाजूंकडून प्रतिक्रिया अचानक वाढल्या आणि सगळेच आक्रमक झाले. काही वेळातच दोन्ही पक्ष एकमेकांना भिडले. जमावातील कोणीही हातात जे काही असेल ते घेऊन प्रतिस्पर्ध्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण शांत केले.