प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रत्येकालाच वाईट बॉसशी सामना करावा लागतो. बॉसच चिडणे, ओरडणे प्रत्यकजणच सहन करतो पण त्याच्याविरुद्ध बोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही. मात्र चीनमधील या बॉससारखा बॉस जर का तुमच्या वाटेला आला तर, या बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकून तुम्ही तिथून बाहेर पडला असता. कारण चीनमधील एका कंपनीच्या बॉसने कर्मचारी कामाचे टारगेट पूर्ण करू शकले नाहीत म्हणून, त्यांना स्वतःची लघवी प्राशन करण्यास सांगितले. तसेच या कर्मचाऱ्याला जोपर्यंत बॉस थांब म्हणंत नाही तोपर्यंत झुरळ खाण्यास भाग पाडले आहे.

या कंपनीने कर्मचाऱ्याला दिलेल्या शिक्षेचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्याला बेल्टचे फटके मारण्यात येत आहेत. एखाद्या कंपनीमध्ये अशा प्रकारचा अमानवीय प्रकार घडत असलेला पाहून सोशल मिडीयावर चारही बाजूंनी संताप व्यक्त केला जात असून, या कंपनीबाबत टीकेची झोड उठत आहे.

या कंपनीमध्ये फक्त लघवी पिणे हीच शिक्षा नाही तर, टक्कल करणे, बेल्टचे फटके मारणे,  टॉयलेटचे पाणी प्यायला देणे, किडे खायला देणे अशा प्रकारच्या अतिशय अमानवीय शिक्षा दिल्या जातात. आणि या सर्व शिक्षा संपूर्ण स्टाफच्या समोर दिल्या जातात.

कंपनीची नोकरी सोडल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी या घटनांची माहिती दिली. त्यांनी हेही सांगितलं की, जर चुकून कधी फॉर्मल कपडे किंवा शूज घालून कंपनीत गेलो नाही तर 50 युआन दंड द्यावा लागतो. याधीही या कंपनीच्या तीन मॅनेजरना स्टाफसोबत असा व्यवहार करतात म्हणून 5 ते 10 दिवसांचा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. मात्र अजूनही हे प्रकार चालूच आहेत. कंपनीकडून मिळत असलेल्या तगड्या पगारामुळे हे कर्मचारी हा त्रास सहन करत मुकाट्याने इथे काम करतात.