Video: ट्रेन प्रवासात बॅग गायब, मंत्री महोदय म्हणाले 'मोदी करत आहेत बॅगांची चोरी'
Premsai S Tikam | (Photo Credits: Twitter )

छत्तीसगढ (Chhattisgarh) राज्याचे शालेय शिक्षणमंत्री डॉ. प्रेमसाय सिंह टेकाम (Premsai S Tikam) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. प्रेमसाय सिंह टेकाम यांनी यांनी आपल्या वक्तव्यातून चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच रेल्वेतून बॅग चोरी करण्याचा आरोप करत ही त्यांचीच देण असल्याचे म्हटले आहे. रायपूर ते पेंड्रा रोड दरम्यान मंत्री महोदयांची बॅग दोन दिवसांपूर्वी अमरकंटक एक्सप्रेस ट्रेनमधून चोरी झाली. पेंड्रा रोड येथे पोहोचल्यावर डॉ. प्रेमसाय सिंह यांना आपल्या आपली बॅग बेपत्ता झाल्याचे समजले.

छत्तीसगड राज्यातील कोरिया येथे पत्रकारांनी मंत्री डॉ. प्रेमसाय सिंह टेकाम यांना भाजप सरकारच्या 100 दिवस पूर्ण होण्याबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तरादाखल बोलताना डॉ. प्रेमसाय सिंह टेकाम यांनी वेगळ्याच अंदाजात उत्तर दिले. ते म्हणाले, 'मोदीजी रेल्वेमध्ये चोरी करत आहेत आणि मंत्र्यांच्याच बॅग चोरत आहेत. ही त्यांचीच देण आहे'.

एएनआय ट्विट

ट्रेनमधून थेट मंत्र्यांचीच बॅग चोरी झाल्याचे समजताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनात चांगलीच खळबळ उडली. मंत्री महोदयांनी बॅग चोरी झाल्याची तक्रार दिली नाही. परंतू, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षेव प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. मंत्री टेकाम हे 17 सप्टेंबर रोजी अमरकंटक सुपरफास्ट एक्सप्रेसने रायपुर येथून पेंड्रा येथे निघाले होते.दरम्यान, पेंड्रा रोड येथे पोहोचल्यावर मंत्री. टेकाम यांना बॅग हरवल्याचे ध्यानात आले. अनेक वेळा शोध घेऊनही बॅगचा तपास लागलाच नाही. बॅगमध्ये 30 हजार रुपये रोख आणि इतर साहित्य असल्याचा दावा टेकाम यांनी केला आहे.