इंटरनेटवर व्हायरल होतेय 'Chemistry Teacher Couple' ची लग्न पत्रिका, Shashi Tharoor पासून सामान्य नेटकर्‍यांना पडली भूरळ
Chemistry Teacher Couple viral wedding Invitation Card (Photo Credits: Facebook)

लग्न हे भारतीय संस्कृतीमध्ये एका मोठ्या सोहळ्याप्रमाणे सेलिब्रेट केलं जातं. 'लग्नपत्रिका' हा त्या सोहळ्याच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग असतो. सध्या इंटरनेटवर केरळमधील एका 'केमेस्ट्री' शिक्षक जोडप्याची लग्नपत्रिका सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. लग्नपत्रिका बनवताना वापरण्यात आलेली क्रिएटीव्हीटीचं सगळ्यांनाच कौतुक आहे. केद्रीय मंत्री शशी थरूर(Shahi Tharoor) यांच्यापासून अगदी सामान्य नेटकर्‍यांनी या पत्रिकेचं कौतुक केलं आहे.

लग्नपत्रिकेमध्ये विशेष काय ?

विथून शेखर (Vithun Chandra Sekhar) आणि सूर्या नायर (Soorya Nair )हे दोघही रसायनशास्त्र शिक्षक आहेत. 'रसायनशास्त्र' या विषयामुळेच त्यांची केमेस्ट्री जुळल्याने त्यांची लग्नपत्रिकादेखील याच थीमवर बेतलेली आहे. विथूनच्या नावाची आद्याक्षर Vn आणि सूर्याच्या नावाची आद्याक्षर Sn हे atom च्या स्वरूपात दाखवण्यात आली आहेत. यांच्या लग्नाचं स्थळ Laboratory च्या खाली लिहण्यात आले आहे तर Reaction on असे लिहून त्याच्या लग्नाची तारीख, मुहूर्त वेळ लिहण्यात आली आहे.

सोशल मीडियावर ही लग्नपत्रिका तुफान व्हायरल होत आहे. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनादेखील या लग्नपत्रिकेच्या क्रिएटीव्हिटीची भूरळ पडली आहे. यामधील मजकूराप्रमाणेच शशी थरूर यांनी जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

सोशल मीडियातून सामान्य नागरिकांकडूनही लग्नपत्रिकेचं कौतुक आणि जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.