Pit Bull Attack: अल्पवयीन मुलावर पिटबुल डॉगचा हल्ला, मोकाट कुत्र्यांमुळे वाचले पीडिताचे प्राण (Watch Video)

दिल्लीतील गाझियाबादमध्ये काल एका 15 वर्षीय मुलावर आक्रमक पाळीव पिटबुलने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्या नंतर मुलाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.  दरम्यान, काही भटक्या कुत्र्यांनी पिटबुलवर हल्ला केला आणि यावेळी मुलगा घरात पळून गेला. त्या कुत्र्यांमुळे मोठा अनर्थ टळल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.  (हेही वाचा - Viral Video: शॉपिंग करताना मुलीने दुकानात उघड्यावरच अर्धनग्न होऊन ट्राय केले नवीन कपडे; व्हिडिओ व्हायरल)

पाहा व्हिडिओ -

सोशल मिडीयावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये दिसत आहे की एका कुत्र्याने 15 वर्षांच्या मुलावर हल्ला केला. आश्चर्याची बाब म्हणजे तेथे काही लोक उपस्थित आहे पण ते त्याला कोणतीही मदत करत नाही आहे. सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पुढे दिसून येते की, मुलाने स्वतः कुत्र्याला दूर ढकलून, उभे राहून सुरक्षित ठिकाणी पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही कुत्रा त्याच्या मागे लागतो. परंतू भटक्या कुत्र्यांनी पिटबुलवर हल्ला केला आणि यावेळी मुलगा घरात पळून गेला.

या पिटबुलचे मालक नुकतेच गाझियाबादमध्ये राहण्यासाठी गेले होते, तेथील इतर रहिवाशांनी कुत्र्यांच्या धोकादायक जाती न ठेवण्याची विनंती केली होती, परंतु कुटुंबाने त्यांचे ऐकले नाही.  अद्याप या प्रकरणाशी संबंधित कोणतीही तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही. गाझियाबाद महापालिकेने आक्रमक पिट बुल ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, केंद्र सरकारने पिट बुलसह 23 जातीच्या क्रूर कुत्र्यांच्या विक्री आणि प्रजननावर पूर्ण बंदी घालण्याचे निर्देश जारी केले आहेत.