सोशल मीडियावर सध्या सीबीएसई बोर्डाकडून ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतचे मेसेज व्हायरल होत आहेत. त्यामुळे आधीच कोरोना संकटामुळे चिंतेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनातील भीती वाढत आहे. दरम्यान एकीकडे भारत COVID-19 pandemic चा सामना करत असताना निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा घेत काही जण खोट्या बातम्या पसरवत आहेत. सध्या सीबीएसई बोर्डाने शाळांना ऑनलाईन परीक्षा घेण्याअसाठी VH Softwares चं अॅप विकसित करून विकत घेत असल्याचं तसेच Officer on Special Duty यासाठी नेमणूक होणार असल्याची खोटी माहिती पसरवली जात आहे. e-Pariksha Online Examination चे बोर्डाकडून टेस्टिंग करण्यात अअले असून ऑडिओ-व्हिज्युअल मूव्हमेंटद्वारा चिटिंग होणार नाही याची खात्री करण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडीयामध्ये व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये VH Softwares कडून अॅप बनवण्यात आलं असुन डॉ. साहिल गेहलोत (Dr Sahil Gehlot)यांची OSD म्हणून नेमणूक झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. मात्र पीआयबीने अधिकृत ट्वीटर हॅनडलवरून हा दावा फेटाळून लावला आहे. CBSE 10th, 12th Board Exam 2020 Dates: सीबीएसई बोर्डाचं दहावी, बारावीचं नवं वेळापत्रक जाहीर cbse.nic.in वरून करा डाऊनलोड!
PIB Tweet
Claim-CBSE has directed Schools to conduct online exam by purchasing an app developed by VH Softwares & appointed Dr Sahil Gehlot as OSD for this.#PIBFactcheck - #FakeNews. This is Fake and Misleading. #CBSE neither endorsed this nor has appointed any OSD for this purpose. pic.twitter.com/V1Z025UYq2
— PIB Fact Check (@PIBFactCheck) June 1, 2020
यंदा एप्रिल महिन्यामध्ये सीबीएसई बोर्डाला पास करण्याच्या, पेपर तपासण्याच्या नव्या पद्धतीबाबतची अशाप्रकारे खोटे मेसेज व्हायरल केल्याचं समजलं होतं. दरम्यान बोर्डाकडून अशा खोट्या बातम्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सोशलमीडियावरील अधिकृत हॅन्डल्सवरून दिल्या जाणार्या माहितीवर विश्वास ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान सीबीएसई बोर्डाने 10वी, 12 वीच्या उर्वरित परीक्षांसाठीचे वेळापत्रक जारी केलं आहे. त्यानुसार जुलै महिन्यात 15 तारखेपर्यंत उर्वरित परीक्षा होणार आहे.