जुहू विमानतळाच्या रनवे वर कॅटफिश माशांचे आगमन, पाहा असं नेमकं घडले तरी काय?
CatFish (Photo Credits: Twitter)

महिनाभर दडी मारून बसलेल्या पावसाने शुक्रवारपासून मुंबईत जबरदस्त एन्ट्री केली आहे. मुंबईतील या मुसळधार पावसाचा जोर आजही कायम आहे. मात्र या पावसामुळे मात्र सागरी जनजीवन विस्कळीत  झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जुहू विमानतळाच्या (Juhu Airport) रनवे वर चक्क कॅटफिश  माशांनी (Catfish) 'अतिक्रमण' केले असून त्यांना हटविण्याचे काम करत येथील कर्मचारी करत आहेत. या माशांचे अतिक्रमण इतके वाढले होते की, त्यांना हटवता हटवता कर्मचा-यांच्या नाकी नऊ आले होते.

जुहू विमानतळ हे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथे खाजगी हेलिकॉप्टर आणि एयरक्राफ्ट सुद्धा उतरतात. मात्र शनिवारी अचानक या विमानतळाच्या धावपट्टीवर कॅटफिश माशांनी अतिक्रमण पाहून विमानतळाचे अधिकारी आणि वैमानिकसुद्धा हैराण झाले होते. हे मासे 3 फूट इतके लांबीचे होते.

तसे पाहायला गेले तर, जुहू विमानतळासाठी ही गोष्ट काही नवीन नाही. हे विमानतळ सखल भागात येत असून जवळच एक नाला आणि अरबी समुद्र आहे.

हेही वाचा- गोदावरी नदीचे पाणी आटल्यामुळे हजारोंच्या संख्यने माशांचा मृत्यू

येथील वरिष्ठ वैमानिकांचे असे म्हणणे आहे की, जुहू विमानतळाचा बहुतांशी भाग हा थोड्याशा पावसामुळेही पाण्याखाली जातो. त्यामुळे सध्या विमानतळाची फायर सर्विस या घुसखोरी केलेल्या कॅटफिशला हटविण्याच्या मागावर आहेत. त्यासाठी ते एका वाहनासह प्लॅस्टिक ड्रम घेऊन फिरतात आणि माशांना पकडून त्यात टाकण्याचे काम करतात.