लॉकडाऊन चा काळ मजेशीर घालविण्यासाठी टिकटॉक व्हिडिओ बनवणे, नृत्य यासारख्या कलेतून लोकांना खूश करण्यासाठी कलाकारांप्रमाणेच सामान्य लोकही आपले भन्नाट व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत आहेत. यातच नुकता एक अवलिया सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या अवलियाने दबंग खान सलमान खानचे हिट गाणे 'टन टना टन' (Tan Tana Tan) ला राजेश खन्नाचे गाणे 'कहीं दूर जब दिन ढल जाए' गाण्याचे सूर लावले आहेत. हे अफलातून कॉम्बिनेशन तुम्ही ऐकाल तर तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
विक्रांत असे या अवलियाचे नाव असून हा व्हिडिओखाली 'नक्की पाहा ही अजब कलाकारी' असे म्हटले आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.
करीना ने सैफ अली खान आणि मुलगा तैमूरसह बनवले जबरदस्त आर्टवर्क, सोशल मिडियावर शेअर केला फोटो
पाहा हा मजेशीर व्हिडिओ:
Must see video for today - Gazab ki Kalakari 😂🙏 pic.twitter.com/3z0BvLy3VW
— Vikrant ~ विक्रांत (@vikrantkumar) May 15, 2020
प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशिर यांनी देखील या व्हिडिओचे कौतुक केले आहे. सलमान खान, करिश्मा कपूर यांचे हे हिट गाणे असलेला 'जुडवा' चित्रपट हा 1997 साली प्रदर्शित झाला होता. ट्विटरवर आलेले या गाण्याचे हे व्हर्जन लोक खूप पसंत करत आहेत.