Bengaluru Couple Rides Scooter: मुलाला पायट्यावर उभा करुन जोडप्याचा दुचाकीवरुन प्रवास, Viral Video पाहून सोशल मीडियावर संताप
Bengaluru Couple Rides | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Bengaluru Couple Video: दुचाकीवर स्टंट (Bike Stunt) करणाऱ्यांची भारतात कमी नाही. अशा महाभाग मंडळींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकदा हे व्हिडिओ मनोरंजक असतात पण कधी कधी हे व्हिडिओ सोशल मीडियावर वापरकर्त्यांच्या प्रचंड संतापाचे कारण ठरतात. बंगळुरु येथील एका जोडप्याचा (Bengaluru Couple Rides Scooter) असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो पाहून नटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. हे जोडपे एका लहान मुलाला दुचाकीच्या पायट्यावर उभा करुन दुचाकी चालवताना दिसते आहे. सोशल मीडिया X वर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत?

व्हिडिओमध्ये पाहयला मिळते की, एका दुचाकीवरुन एक जोडपे प्रवास करत आहे. त्यांच्यासोबत एक लहान मुलगाही आहे. पुढे एक व्यक्ती दुचाकी हाकतो आहे. त्याच्यापाठीमागे दुसरी महिला बसली आहे. सोबत असलेल्या लहान मुलाला त्यांनी दुचाकीवर बसण्याच्या ठिकाणी आपल्यासोबत घेण्याच्या ऐवजी त्याला चक्क पायट्यावर उभा केले आहे. अत्यंत धोकादायक अशा पद्धतीने दुचाकीवरुन रहदारी असलेल्या रस्त्यावरुन हे जोडपं प्रवास करते आहे. पाठिमागून येणाऱ्या वाहनातील कोणीतरी हा व्हिडिओ चित्रित केला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडओत दिसणाऱ्या दुचाकीचा क्रमांक निटसा दिसत नाही. मात्र, हे जोडपे आणि घटना बंगळुरु येथील असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Couple Romance On Bike Video: चालत्या दुचाकीवर पांघरुनाआडून चाळे, पोलिसांकडून युगुलावर कारवाई (Watch))

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. अनेक वापरकर्त्यांनी अत्यंत बेदरकारपणे वाहन चालविल्याबद्दल या जोडप्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. काहींनी केवळ जाणीवपूर्वक स्टंट असा या घटनेचा उल्लेख केला आहे. काही लोक तर यांना अपघाताची भीती कशी वाटत नाही, या प्रश्नाने हैराण झाले आहेत. काहींनी मात्र नुसतेच आश्चर्य व्यक्त केले आहे. (हेही वाचा, Monkey and Mirror Viral Video: माकड आणि आरसा, गंमत झाली भारी; प्रतिमा पाहून शोधत राही, सापडतंय का काही?)

व्हिडिओ

दरम्यान, दुचाकीवरुन स्टंट केल्याचे अनेक व्हिडिओ याआधीही व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये हात सोडून दुचाकी चालवणे, विरा शिरस्राण वापरता बेदरकारपणे वाहण हाकने, दोघा-तिघांपेक्षा अधिकाधिक लोकांनी दुचाकीवर बसून प्रवास करणे. दुचाकी चालकाच्या पुढे उलट्या दिशेने बसणे, दुचाकीवर नग्नावस्थेत अंघोळ करणे, रस्त्यात नको त्या ठिकाणी अचानक ब्रेक मारुन दुचाकीची मागचे चाक हवेत उचलणे, दुचाकी रस्त्यावर गोलगोल फिरवणे, दुचाकीचे धुराडे आर्धे कापून त्या ठिकाणी आवाज मोठा करुन शहरांमधील रस्त्यांवरुन फिरणे यांसारखे एक ना अनेक उद्योग स्टंट करणारी मंडळी करत असतात.