Viral Video: आत्महत्येपूर्वी मुलीने चेहऱ्यावर हास्य ठेवून कुटुंबाला दिला 'हा' शेवटचा संदेश; साबरमती नदीत उडी मारून दिला जीव; पहा भावनिक व्हिडिओ
आयशा आरिफ खान, (फोटो क्रेडिट्स: यूट्यूब)

Viral Video: गुजरातमधील (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथील साबरमती नदीत (Sabarmati River) उडी मारुन विवाहिक आयेशाने आत्महत्या केली. नदीत उडी मारण्यापूर्वी तिने जगासाठी अखेरचा एक संदेश रेकॉर्ड केला. ज्यात तिने म्हटले आहे की, आपण दबावाखाली येऊन आत्महत्या करत नसून अल्लाह भेटेल याचा मला आनंद आहे. व्हिडिओ बनवल्यानंतर तिने तो आपल्या कुटूंबाला पाठवला आणि मग नदीत उडी मारली. व्हिडिओ तिच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. मात्र, तोपर्यंत ती नदीत बुडली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि आयशाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.

नदीत उडी मारण्यापूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आयशा म्हणाली, 'नमस्कार, अस्सलामु अलैकुम, माझे नाव आयशा आरिफ खान आहे आणि मी आता जे करणार आहे, ते मी माझ्या इच्छेनुसार करणार आहे. माझ्यावर कोणताही दबाव नव्हता. आता मी काय बोलू? फक्त समजून घ्या की अल्लाहने दिलेले जीवन एकसारखेचं आहे आणि माझे हे लहान जीवन आरामशीर होते. प्रिये बाबा, तुम्ही तुमच्या प्रियजनांशी किती काळ लढणार? खटला मागे घ्या. भांडण नाही. आयशा भांडणासाठी बनलेली नव्हती. आरिफवर प्रेम करत असाल तर, त्रास देणार नाहीत. जर त्याला स्वातंत्र्य हवे असेल, तर तो मुक्त आहे. माझं जीवन इथपर्यंतचं आहे. मला आनंद आहे की, मी अल्लाहला भेटेल आणि मी चूक केली आहे हे त्याला सांगेन. माझे खूप चांगले आईवडील मिळाले. मित्रदेखील खूप चांगले मिळाले. पण कदाचित माझ्यात किंवा माझ्या नशिबात काहीतरी कमी आहे. मी आनंदी आहे आणि मला शांततेत जायचं आहे. मी अल्लाहला प्रार्थना करते की, पुन्हा मला मानवाचा चेहरा दाखवू नये.' (वाचा - Viral Photo: काय चूक आहे त्या बिचाऱ्या कोरोना व्हायरसची? मुंबई लोकलमध्ये मास्क डोळ्यावर ठेवून झोपलेल्या व्यक्तीचा फोटो शेअर करत काँग्रेस नेत्याने केला सवाल)

एक गोष्ट नक्कीच शिकली आहे. प्रेम करा, पण दोन्ही बाजूंनी करा, एकतर्फी प्रेमात काहीचं साध्य होत नाही. काहींच प्रेम लग्नानंतरही अपूर्ण राहतं. या नदीला प्रार्थना करते की, तिने मला यात जागा द्यावी. कृपया मी गेल्यानंतर जास्त वाईट वाटू देऊ नका. मी वाऱ्यासारखी आहे. मला फक्त वाहायचं आहे. मी आज आनंदी आहे, मला हव्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. ज्याला जे सत्य सांगायचं होत, ते मी सांगितलं आहे. तेवढे पुरेसे आहे आणि मला आठवणीत ठेवा. धन्यवाद पुन्हा भेटू.

आयशाने 2018 मध्ये राजस्थानच्या जलोरमध्ये राहणाऱ्या आरिफ खानशी लग्न केलं होते. अहमदाबादमध्ये राहणारी आयशाचे वडील लियाकत अली हे व्यवसायाने टेलर आहेत. आयशाच्या वडिलांनी सांगितले की, लग्नानंतर आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. पैसे दिल्यानंतरही त्यांचा लोभ वाढतचं असल्याचेही लियाकत अली यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी आरिफने आयशाला अहमदाबादला सोडले होते. आयशाचा पती आरिफ तिच्याशी फोनवर बोलतही नव्हता. काही दिवसांपूर्वी आयशाने तिला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. ज्यानंतर आरिफने आयशाला मरायचं असेल तर जाऊन मरण्याचा सल्ला दिला होता.