काकीच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचू न शकलेल्या ऑस्ट्रेलियन शेतकऱ्याने दिली अनोखी श्रद्धांजली; पहा चकीत करणारा Video
श्रद्धांजली वाहण्याची अनोखी पद्धत (Photo Credits: Instagram)

Viral Video: मागील संपूर्ण वर्ष जगभरात कोविड-19 संकटाने (COVID-19 Pandemic) थैमान घातले होते. त्यानुळे संपूर्ण जगातील लोक त्या संकटाचा सामना करत होती. या माहामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंतिम दर्शनही नातेवाईकांना नीट घेता आले नाही. त्यामुळे ती सल अनेकांच्या मनांत असेल. अशीच काहीशी घटना एका ऑस्ट्रेलियन शेतकऱ्यासोबत (Australian Farmer) घडली होती. हा शेतकरी आपल्या काकीच्या  (Aunt) अंत्यसंस्कारासाठी (Funeral) पोहचू शकला नव्हता. त्यामुळेच त्याने काकीला अनोखी श्रद्धांजली देण्याचे ठरवले आणि त्याचीही कृती आता जगासमोर आली असून याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल (Viral) होत आहे.

बेंजामिन जॅक्सन असे या ऑस्ट्रेलियन शेतकऱ्याचे नाव असून त्याने आपल्या मेंढ्यांच्या माध्यमातून आपल्या दिवंगत काकीला श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासाठी त्याने मेंढ्यांपासून हार्ड शेप तयार केला आहे. हा संपूर्ण प्रसंग त्याने कॅमेऱ्यात कैद केला असून बँकग्राऊंडला 'Bridge over Troubled Water by Simon and Garfunkel' हे गाणं अॅड केलं आहे. हे गाणं त्याच्या काकीचे आवडते होते. या संपूर्ण व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे आणि त्याच्या या कृतीचे प्रचंड कौतुक होत आहे. (Funny Monkey Viral Video: माकड घेतय झडती, मर्कटलीला पाहून उपस्थितांना आवरेना हसू; पाहा व्हिडिओ)

पहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Benjamin Jackson (@electricpostman)

या व्हिडिओत मेंढ्यांचा कळप हार्ड शेप तयार करतो. हे दृश्यं ड्रोनच्या माध्यमातून शूट करण्यात आले आहेत. खरंतर हार्ड शेप तयार करण्यासाठी बेंजामिनने त्या आकारात मेंढ्याचे खाणे टाकले आणि मेंढ्यांना सोडून दिले. त्यानंतर मेंढ्यांच्या कळपाने बरोबर तो आकार तयार केला. हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो-लाखो लोकांनी पाहिला असून यावर विविध प्रतिक्रीया येत आहेत.