Australia: मुलीचे अतिवजन असल्याने वॉटर पार्कमध्ये स्लाइडमध्ये जाण्यास नकार, अपमानानंतर आईने शिकवला धडा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

Australia: थीम पार्क किंवा वॉटर पार्कमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना तेथे जाण्यासाठी परवानगी असते. वॉटर पार्कमध्ये वॉटर राइड्स आणि विविध खेळांची मजा घेता येते. परंतु एका मुलीला तिच्या अतिवजनामुळे वॉटर पार्कमधील स्लाइडमध्ये जाण्यास नकार दिला गेला. या घटनेनंतर मुलीच्या आईने वॉटर पार्कच्या व्यवस्थेवर संताप व्यक करत त्यांना चांगलाच धडा शिकवला. त्यानंतर वॉटर पार्कच्या व्यवस्थेने माफी मागितली.

ऑस्ट्रेलिया येथील पर्थ स्थित अॅडवेंचर वर्ल्ड वॉटर पार्क सध्या चर्चेत आगे. त्यानुसार या वॉटर पार्कने एक नियम काढला असून स्लाइडमध्ये जाण्यापूर्वी प्रत्येकाला आपले वजन तपासून घ्यावे लागणार आहे. व्यक्तीचे वजन हे मर्यादेच्या अपेक्षेप्रमाणे असेल तर त्याला स्लाइडमध्ये जाण्यास परवानगी असणार आहे.(Shocking! Man Swallows Snake: व्यक्तीने गिळला चक्क जिवंत साप; धोकादायक स्टंट आला अंगाशी, जाणून घ्या काय घडले पुढे...)

एक 13 वर्षीय मुलगी आपल्या बहिणीसोबत पार्कमध्ये आली होती. दोघींनी स्लाइडमध्ये जाण्याचे ठरवले आणि त्याआधी खुप मोठी रांग सुद्धा लागली होती. तेथे मुलीचे वजन तपासत असल्याचे पाहिले पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र जेव्हा तिने स्लाइडमध्ये प्रवेश केला तेव्हा तेथील कर्मचाऱ्यांनी तिचे वजन तपासून पाहण्यास सांगितले. तेव्हा तिचे अतिवजन असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे तिला खुप वाइट वाटले आणि कर्मचाऱ्यांनी दिलेली वागणूक सुद्धा तिला आवडली नाही.

मुलीच्या आईला जेव्हा हे कळले तेव्हा तिने सोशल मीडियात वॉटर पार्कच्या विरोधात संताप व्यक्त केला. तिने असे म्हटले की, तिच्या मुलीचा अपमान करण्यात आला आहे. तसेच एन्ट्री फी सुद्धा त्यांनी परत मागितली आहे. हे प्रकरण अधिक वाढले तेव्हा सीईओ एंड्रू शेरी यांनी फेसबुकवर माफी मागितली. त्यांनी असे म्हटले की, पार्कमध्ये लोक मजामस्ती करतात. पण आमच्या नियमामुळे लोकांना दु:ख पोहचत आहे. आम्ही सुरक्षिततेच्या कारणामुळे हा नियम लागू करण्यात आला होता. सीईओ यांनी महिला आणि तिच्या मुलीला फोन करुन माफी मागितली आहे.