Asha Ambade Viral Video: 68 वर्षीय आजीबाईंनी सर केला नाशिकचा हरिहर किल्ला; पहा तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा उत्साह (Watch Video)
Aaji climbs Harihar fort (Photo Credits: Video grab)

जर तुम्ही ट्रेकर्स असाल तर सहाजिकच तुम्हांला खड्या चढणीवर तोल सांभाळत चढ्णं किती कठीण असेल याचा अंदाज असेल. पण असं म्हणतात आव्हानचं ट्रेकर्सला खुणावत असतात. मग त्याला 68 वर्षीय आशा अंबाडे (Asha Ambade) तरी अपवाद कशा ठरतील 'वय हा अंकांचा खेळ असतो, इच्छा तिथे मार्ग दिसतोच'. याचं जीवंत उदाहरण म्हणजे आशा अंबाडे या ट्रेकर्स आजी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नाशिक  (Nashik) मधील हरिहर किल्ला (Harihar Fort) सर केला आहे. हा किल्ला सुमारे 80 अंशाच्या खड्या चढणीचा आहे. मात्र प्रबळ इच्छाशक्ती असणार्‍या आशा अंबाडे यांनी तो सर केला . मागील 2 दिवसांपासून त्याचे व्हायरल फोटो, व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केले आहेत. अनेक तरूण मंडळींनी, ट्रेकर्सनी त्यांच्या साहसाचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्रात नाशिक जवळ इगतपुरी मध्ये हरिहर किल्ला आहे.

बीबीसी मराठी शी बोलताना त्यांनी या ट्रेक मागची कहाणी सांगितली आहे. 'आशा यांची मुलं वरचेवर ट्रेकिंगला जात असे. मुलांच्या त्यांच्या मित्रांसोबतच्या ट्रेकिंगचं त्यांना कौतुक होतं. एकदा त्यांच्या मुलाने आपण जाऊया का 'हरिहर'ला? असं विचारलं. सुरूवातीला हो-नाही असं करता करता त्यांच्या मुलांनी दाखवलेल्या विश्वासामुळे त्या तयार झाल्या. त्यांचा फीटनेस उत्तम आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांनाही आई हरिहर सर करू शकते हा विश्वास होता. आशा अंबाडे यांना व्यायामाची सवय आहे.काही दिवसांपूर्वी त्यांची सून, नातवंड यांनी देखील हा ट्रेक आशा आज्जींसोबत केला आहे. दिल्ली: बाबांच्या भावूक व्हिडिओनंतर 'Baba Ka Dhaba' ला नेटकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद; पहा फोटोज आणि व्हिडिओज

आशा अंबाडे यांचे व्हायरल व्हिडिओ

या वयात आजीबाई हरिहर गड सर करताना.

..

Read more at:

https://www.latestly.com/social-viral/amazing-aaji-68-year-old-asha-ambade-climbs-steep-steps-of-harihar-fort-in-nashik-viral-video-proves-age-is-just-a-number-2077564.html

आशा आज्जींनी गड सर केल्यानंतर त्यांचं गडावरील तरूण मंडळींनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. तेथे छत्रपती शिवाजी महाराज की जय चादेखील आवाज घुमला. आता आशा अंबाडे यांना महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असलेले कळसूबाई आणि भास्करगड देखील सर करायचा आहे. आशा अंबाडे आजींचं साहस अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.