Angry Bull Viral Video: बैलांचे भांडण थांबवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला बैलाने जे केले ते पाहून बसेल धक्का
Angry Bull Viral Video

Angry Bull Viral Video:  कधी कधी दोन व्यक्तींच्या भांडणात येऊन हस्तक्षेप करणं कठीण होऊन बसतं, म्हणूनच असं म्हणतात की एखाद्याच्या भांडणात विनाकारण हस्तक्षेप करू नये. मात्र, या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कोणाच्या तरी भांडणात हस्तक्षेप करणारे अनेक जण आहेत. सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन बैल एकमेकांशी भांडत आहेत, त्यांची भांडणे थांबवण्यासाठी एक व्यक्ती धावून येतो आणि समोर उभा राहतो. यानंतर काय होईल, याची त्या व्यक्तीने कल्पनाही केली नसेल.

हा व्हिडिओ ndtvindia ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यासोबत कॅप्शन लिहिले आहे की, दोन भटक्या बैलांमधील भांडण थांबवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच बैलाने हल्ला केला, ज्यानंतर तो तरुण किरकोळ जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील राजपुरा रोडचे आहे.

व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by NDTV India (@ndtvindia)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील राजपुरा भागातील असल्याचे सांगण्यात येत आहे. जिथे रस्त्यावरील दोन बैलांच्या भांडणात एक व्यक्ती येते आणि हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही बैल रस्त्याच्या मधोमध सुमारे अर्धा तास भांडत होते, तेव्हा तेथून जाणारा एक व्यक्ती येऊन त्यांची झुंज थांबवण्यासाठी मध्यभागी उभा राहिला. त्या व्यक्तीने बैलाची शेपटी पकडली, त्यामुळे बैल चिडतो आणि त्या व्यक्तीला उचलून जमिनीवर फेकतो.