भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनासाठी अमृतसरच्या शिक्षकाने बनवला खास राष्ट्रध्वज; 71,000 टूथपिक आणि 40 तासाच्या मेहनतीचे 'असे' आहे फळ (See Photos)
Indian Flag (Photo Credits: ANI)

प्रत्येक भारतीयासाठी खास असणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी (Republic Day 2020) आता अवघे काहीच दिवस शिल्लक आहेत, असं म्हणतात भारतीयांच्या सणातील उत्साहाला कशाचीच तोड नसते, आणि हा तर आपला राष्ट्रीय सण (National Festival)  असल्याने यदिनाच्या आधीच सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिल्लीतील राजपथावर (Rajpath) आयोजित करण्यात येणाऱ्या परेड पासून ते बाजारात विकल्या जाणाऱ्या छोट्या छोट्या झेंड्यांपर्यंत सर्वत्र ही तयारी अगदी प्रकर्षाने दिसून येते. असाच खास उत्साह पंजाबच्या (Punjab) अमृतसर (Amritsar)  येथील एका शिक्षकाने देखील दाखवत यंदाच्या प्रजासत्ताक दिनासाठी अनोख्या रूपात राष्ट्रध्वज तयार केला आहे. विशेष म्हणजे या हा ध्वज कपड्याचा नसून चक्क टूथपिक पासून बनवण्यात आला आहे, यासाठी तब्बल 71 हजार टूथपिक वापरण्यात आल्या असून 40 तासांच्या मोठ्या अवधीत या शिक्षकाने ध्वज पूर्ण केला आहे.

ANI या वृत्तसंस्थेने या ध्वजांचे काही फोटो शेअर केले आहेत, यात आपण पाहू शकता की टूथपिक जोडून त्याचे तिरंगी माळ शिक्षकाने बनवली आहे आणि मग या मला जोडून एक ध्व्ज साकारण्यात आला आहे. अगदी हटके अशीहि कल्पना नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

ANI ट्विट

दरम्यान, आज राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी रंगीत तालीम घेण्यात आली होती, मागील कित्येक दिवसांपासून या परेडकरीता जवानांचा सराव करून घेण्यात येत आहे, जवानांची साहसी प्रर्दर्शने आणि भारतातील राज्यांचे संस्कृती प्रदर्शन करणारे चित्ररथ हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील लक्षवेधी मुद्दे ठरतात. त्यामुळे शक्य असल्यास प्रत्यक्ष किंवा निदान लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रत्येकाने हा सोहळा नक्की पाहावा. प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वाना ऍडव्हान्स मध्ये खूप खूप शुभेच्छा!