AirAsia CEO Tony Fernandes | (Photo courtesy: linkedin)

AirAsia चे CEO टोनी फर्नांडिस सोशल मीडियावर सध्या भलतेच ट्रोल झाले आहेत. एका व्यवस्थापन बैठकीत त्यांनी चक्क संवाद साधता साधता स्वत:चे कपडे काढून मसाज करुन घेतला. या विचित्र प्रकाराचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि भलतीच चर्चा रंगली. अलीकडेच कंपनीच्या कार्य संस्कृतीचे कौतुक करण्यासाठी LinkedIn वर एक पोस्ट शेअर केली. खरेतर पोस्ट मध्ये त्यांनी विशेष काहीच लिहीले नव्हते पण त्यांनी शेअर केलेले एक चित्र मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ज्यामुळे ऑनलाईन समुदयाला चर्चेला एक निमित्त मिळाले.

टोनी फर्नांडिसयांनी आपल्या पोल्टच्या माध्यमातून किमतीच्या मलेशियन एअरलाइनमधील कामाच्या संस्कृतीचे कौतुक केले आणि त्यांच्या व्यग्र आठवड्याचे वर्णन केले. ज्यामध्ये त्यांनी AirAsia तील कामाची प्रशंसा करत त्यांनी म्हटले की, आपण कामाच्या बाबतीत लवचीक धोरण स्वीकारतो. काम आणि विश्रांती यांचा मेळ घालण्यासाठी आपण प्राधान्य देतो. त्यांनी पोस्टमध्ये पुढे म्हटले की, हा आठवडा माझ्यासाठी फारच धकाधकीचा होता. त्यामळे वेरानिता योसेफिन हिने मला मालीश करण्याचा सल्ला दिला. मला इंडोनेशिया आणि एअरएशिया यांच्याबद्दल प्रचंड प्रेम आहे. मात्र, त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताच प्रसारमाध्यमांतून बातम्या झळकला.

लिंक्डीन पोस्ट

त्यांचा फोटो पाहून एका यूजरने लिहीले, मी शरीराच्या positivity movement मध्ये बदल करण्याच्या या बुद्धीमान मनुष्याचे कौतुक करतो. आम्हालाही अशा प्रकारचे कौतुक करायला हवे. युजरचे म्हणने असे होते की, त्यांनी आपल्या थुलथुलीत शरीराची पर्वा न करता आपला उघडाबंब फोटो त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळेच ते कतुकास पात्र आहेत.

दरम्यान, टोनी फर्नांडिसच्या पोस्टवर अनेक यूजर्सनी नाराजीही व्यक्त केली. एका वापरकर्त्याने लिहिले, “एक वृद्ध माणूस, जो सार्वजनिकरित्या सूचीबद्ध कंपनीचा सीईओ आहे, व्यवस्थापन मीटिंग दरम्यान शर्टलेस मसाज घेतो. हे कुठेही योग्य नाही. या व्यक्तीला पदावरून हटवावे. दुसर्‍या युजरने विनोद केला की, "मी मॅनेजमेंट मीटिंग दरम्यान माझा शर्ट काढला आणि मला काढून टाकले. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, लिंक्डइनवरील माझी आवडती पोस्ट. मी तुमच्या दैनंदिन जीवनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.