Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan च्या पार्श्वभूमीवर सॅन्ड आर्टिस्ट सुदर्शन पटनायक यांनी साकारलं श्रीरामाचं मोहक रूप (View Photo)
श्रीराम सॅन्ड आर्ट । Photo Credits: Twitter/ sudarsansand

भारतामध्ये आज अयोद्धा नगरीत भगवान श्रीरामाच्या मंदिराचा शिलान्यास आणि भूमिपुजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान देशातील अनेक हिंदू बांधवांसाठी आजचा हा दिवस दिवाळसणाप्रमाणे आहे. कोरोना संकटामुळे आज अयोद्धा राम मंदिर भूमिपुजनाच्या कार्यक्रमाला सामान्यांना हजेरी लावणं शक्य नसल्याने अनेकजण जिथे आहेत तिथेच हा मंगल दिवस साजरा करत आहेत. प्रसिद्ध सॅन्ड आर्टीस्ट सुदर्शन पटनायक यांनी देखील पुरी येथील समुद्र किनारी श्रीरामाचं मंदिर आणि त्याच्या छबी सॅन्ड आर्टदवारे साकारली आहे.

पद्मश्री विजेते सॅन्ड आर्टीस्ट सुदर्शन पटनायक हे नेहमीच महत्त्वाच्या प्रसंगी, सणावाराच्यादिवशी सॅन्ड आर्ट द्वारा तो दिवस खास करतात. आजही 492 वर्षांनंतर अयोद्धा नगरीमध्ये श्रीरामाच्या मंदिरासाठी भारत सज्ज असताना त्या मंदिराची आणि श्रीरामाची सुबक प्रतिमा साकारली आहे. Ram Mandir Proposed Model: श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने शेअर केले राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडलचे खास फोटोज! (See Pics).

सुदर्शन पटनायक यांची खास प्रतिकृती

राम मंदिर भूमिपूजनाच्या आजच्या दिवशी देशभर मंगलमय वातावरण आहे. दुपारी 12.30 ते 12.40 दरम्यान शुभ मुहूर्तावर राम जन्मभूमीच्या ठिकाणी आता राम मंदिर उभारण्याच्या कार्याला सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल. तर या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, उमा भारती उपस्थित आहेत. सोबत मुस्लिम, बौद्ध धर्मिय महत्त्वाच्या व्यक्तींना या कार्यक्रमाचं आमंत्रण आहे.