Viral Video: ऑर्डर एक तास उशिरा पोहोचल्यानंतर, ग्राहकाने Zomato Delivery Boy चं असं केलं 'स्वागत'; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ, पहा
Customer welcomed the Zomato Delivery Boy (PC - Instagram)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका Zomato Delivery Boy चा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. झोमॅटो डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी ग्राहकाच्या घरी पोहोचताच ग्राहकांने त्याचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे हा झोमॅटो डिलिव्हरी बॉय ऑर्डर घेऊन सुमारे एक तास उशिरा आला. ऑर्डर दिलेल्या व्यक्तीने आधी डिलिव्हरी बॉयची आरती केली आणि नंतर कपाळावर टिका लावून त्याचे स्वागत केले. हे सर्व पाहून डिलिव्हरी बॉय आश्चर्यचकित झाला. यादरम्यान ती व्यक्ती गाणेही म्हणत होती.

व्हिडिओमध्ये ग्राहक डिलिव्हरी बॉयचे औक्षण करताना 'आइऐ आपका इंतजार था...' हे गाणे गाताना स्वागत करताना दिसत आहे. यावेळी ग्राहकाच्या हातात 'पूजेचे ताट'ही दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 25 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर सुमारे 4 लाख लोकांनी त्याला लाइक देखील केले आहे. (हेही वाचा - Fight Between Young Women in Cafe: कॅफेमध्ये तरुणींमध्ये जोरदार हाणामारी; Watch Viral Video)

इन्स्टाग्रामवर sanjeevkumar220268 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या यूजरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दिल्लीची वाहतूक, तरीही ऑर्डर आली आहे, धन्यवाद झोमॅटो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjeev Tyagi (@sanjeevkumar220268)

दरम्यान, ऑर्डर सुमारे एक तास उशिरा पोहोचल्याचेही या व्हिडिओच्या कॅपश्नमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र असे असतानाही ग्राहकाने डिलिव्हरी बॉयवर आपले प्रेम दाखवले. त्याच्या या उदारतेचे अनेक यूजर्संनी कौतुक केले आहे. बहुतेक वापरकर्त्यांनी व्हिडिओचे मजेदार आणि हृदयस्पर्शी असे वर्णन केले आहे. एका यूजरने म्हटले - कधी कधी उशीर होतो, आपण डिलिव्हरी बॉयचा आदर केला पाहिजे. दुसर्‍या युजरने लिहिले - व्यवसाय कोणताही असो, आपण सर्वांशी प्रेमाने आणि आपुलकीने वागले पाहिजे.