Bulgaria: सिरीन मुराद नावाच्या तरुणीची त्वचा चक्क प्लास्टिक सारखी झाली आहे. 25 वर्षीय तरुणी व्यवसायाने ब्युटीशियन असून ती बल्गेरिया येथे सुट्टी घालवण्यासाठी गेली होती. सनस्क्रीन न लावता उन्हात झोपल्यामुळे तिच्या कपाळाची त्वचा ओढली जात असुन प्लास्टिक सारखी होत आहे हे कळल्यावर तरुणीला जाग आली. तिने सुरुवातीला त्याबद्दल फारसा विचार केला नाही, परंतु नंतर तिची त्वचा प्लास्टिकसारखी दिसू लागल्यामुळे ती चांगलीच घाबरली. तरुणीने आता उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीन वापरण्याबाबत जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. तिने तिच्या कुटुंबाशी या विषयावर चर्चा केली आणि खूप विचारविनिमय केल्यानंतर, डॉक्टरकडे न जाण्याचा निर्णय घेतला. तिला खात्री होती की, तिची त्वचा पूर्ववत होऊन जाईल. [हे देखील वाचा: Man Cuts His Penis: बायकोला जेवणात मदत म्हणून बकरा कापत असल्याचं स्वप्न पाहताना 42 वर्षीय व्यक्तीने कापलं स्वतःचं जननेंद्रिय!]
सिरीन मुरादने लोकांना उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन न लावल्यामुळे काय धोका निर्माण होऊ शकतो याबद्दल सांगितले आहे. सनस्क्रीन न लावल्यामुळे मेलेनोमा हा एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग होऊ शकतो, त्यामुळे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. निरोगी त्वचेसाठी अन्न 1 ऑटोप्ले 1 एवोकॅडो खाणे गरजेचे आहे. निरोगी त्वचेसाठी बाहेरचे खाणे टाळा, भरपूर पाणी प्या असेही तरुणीने सांगितले आहे.