Afsheen Gul: जीवघेण्या मानेच्या एका दुखापतीने ग्रस्त पाकिस्तानी मुलीवर भारतात दिल्लीच्या डॉक्टरांनी मोफत शस्त्रक्रिया करत दिले जीवनदान
Afsheen Gul । Instagram

डॉक्टर हे देवदूत असतात हे दिल्लीच्या Dr Rajagopalan Krishnan यांच्या रूपाने पुन्हा सिद्ध झाले आहे. 13 वर्षीय Afsheen Gul ही पाकिस्तानी तरूणी इतरांप्रमाणे शाळेत जाऊ शकली नाही. आपल्या मित्रमंडळींसोबत खेळू शकली नाही. 10 महिन्यांची असताना अफशीन तिच्या बहिणीच्या हातातून सटकली आणि मानेचं हाड 90 अंशामध्ये फिरलं. तेव्हापासून तशाच अवस्थेमध्ये आहे.

अफशीन च्या पालकांनी तिला डॉक्टरांकडे नेले पण त्या औषधांचा तिच्यावर काहीच परिणाम दिसला नाही. उलट वाढत्या वयासोबत दुखणं देखील वाढत गेले. अद्ययावत औषधोपचारांसाठी तिच्या पालकांकडे पैसे नव्हते. अफशीन सेरेबल पाल्सीने देखील ग्रस्त आहे. या दोन्ही आजारपणांमुळे तिच्या शिक्षणातही अडथळा आला.

मागील वर्षी मार्च मध्ये अफशीन वर भारतात दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटल मध्ये यशस्वी उपचार झाले आहेत. Dr Rajagopalan Krishnan यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे असे बीबीसी न्यूज रिपोर्ट मधून समोर आले आहे. अशाप्रकारे शस्त्रक्रिया झालेली अफशीनची ही जगातली पहिलीच शस्त्रक्रिया झाल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. Pakistan Man Cross Border Fence: पाकिस्तानी तरुण मुंबईकर तरुणीच्या प्रेमात! प्रेयसीला भेटण्यासाठी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न, BSFने केली अटक.

 

View this post on Instagram

 

A post shared by Afsheen Gul (@afsheengul786)

ब्रिटीश पत्रकार Alexandria Thomas यांनी अफशीन आणि Dr Rajagopalan Krishnan यांची भेट घालून दिली नंतर ऑनलाईन फंड रायझर मधून त्यांची पाकिस्तानमधून भारतामध्ये आणण्याची सोय करण्यात आली.

अफशीन वर मानेच्या शस्त्रक्रियेच्या आधी चार मोठी अन्य ऑपरेशन करण्यात आली. मुख्य शस्त्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात झाली. जी 6 तास चालली. आता अफशीनच्या चेहर्‍यावर पुन्हा हास्य आलं आहे. सध्या डॉक्टर तिच्या प्रकृतीवर स्काईप द्वारा वेळोवेळी लक्ष ठेवून आहे.