आदित्य ठाकरे यांची BMW गाडी का ठरली ट्रोलचा विषय? हे ट्विट्स वाचून तुम्हालाही आवरणार नाही हसू
Aditya Thackeray (Photo Credits: Facebook)

शिवसेना (Shivsena) पक्षातून काल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी काल (ऑक्टोबर 3) मुंबईतील वरळी मतदार संघातून निवडणूक अर्ज भरला. त्यात त्यांनी त्यांच्या संपांनीच तपशील नमूद केल्यापासून नेटकऱ्यांना एक वेगळाच विषय सध्या चर्चेला मिळाला आहे.

आदित्य यांनी नमूद केल्यानुसार 16 कोटी 41 लाख इतकी त्यांची एकूण संपत्ती आहे. त्यात त्यांनी एका BMW गाडीचाही उल्लेख केला आहे. पण त्यासोबत लिहिलेली गाडीची किंमत पाहून अनेकांनी आदित्य ठाकरे यांना सोशल मीडियावर ट्रोल केले आहे.

आदित्य यांनी BMW ची किंमत फक्त सडे सह लाख लिहिली आहे.त्यावर एका ट्विटर युझरने खेळण्यातील BMW व लहान मुलाचा फोटो टाकत आदित्य ठाकरे त्यांच्या साडेसहा लाखांच्या BMW मध्ये असं लिहिलं आहे. तर दुसऱ्याने खिल्ली उडवत लिहिले आहे की आदित्यला जुनी गाडी विकत घेणं शोभत नाही.

पहा हे काही धमाल ट्विट

आदित्य ठाकरे यांनी नमूद केलेल्या BMW गाडीची एक्स शोरूम किंमत 64 लाख 80 हजार रुपये इतकी 2010 साली होती. याच मॉडेलची गाडी आपण आज बाजारात खरेदी करायला गेलो तर त्याची किंमत किमान 66 ते 77 लाख रुपये मोजावेच लागणार.