Snake Viral Video (PC - Twitter)

Snake Viral Video: तुम्ही व्हॉट्सअॅपवर असे व्हिडिओ अनेकदा पाहिले असतील, ज्यामध्ये शूज, खुर्च्या इत्यादींमध्ये साप लपण्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा कार, स्कूटी आदींमध्ये साप बसल्याचे व्हिडिओ व्हायरल (Sanke Viral Video) झाले आहेत. स्कूटी-बाईकवर उघड्यावर हेल्मेट लटकवून सोडणे किती धोकादायक असू शकते, याचा अंदाज व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून लावता येतो.

या व्हिडिओमध्ये एक धोकादायक साप हेल्मेटच्या आत लपून बसला आहे. हेल्मेट परिधान करत असताना शेवटच्या क्षणी माणसाची नजर सापावर पडली, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. (हेही वाचा -Mouse In Bread: ऑनलाइन मागवला ब्रेड, पॅकेटमध्ये सापडला जिवंत उंदीर, कंपनीने दिले 'असं' उत्तर)

इंस्टाग्रामवर aahanslittleworld या इंस्टा हँडलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात हेल्मेट आणि दुसऱ्या हातात चिमटा घेऊन उभा आहे. या चिमट्याने ही व्यक्ती हेल्मेटच्या आतून काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत आहे. नंतर चिमट्याच्या साहाय्याने त्या व्यक्तीने हेल्मेटच्या आतून एक साप बाहेर काढला, जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. चिमट्यात दाबल्यामुळे साप मोकळा होण्यासाठी धडपडताना दिसत आहे. नंतर तो सापाला घेऊन घराबाहेर टाकायला जातो.

 

View this post on Instagram

 

A post shared by sharmili (@aahanslittleworld)

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याला 27 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर 11 लाख लोकांनी या व्हिडिओतील थरार पाहिला आहे. लोकांनीही या व्हिडिओवर कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले, हेल्मेट घालण्याआधी पाहिले भाग्यवान. एका युजरने लिहिले, आता हेल्मेट घालण्यापूर्वीचा हा व्हिडिओ नेहमी लक्षात राहील. एका यूजरने लिहिले की, धन्यवाद भाऊ असं लिहिलं आहे. तर एका यूजर्सने फक्त हेल्मेटची शिलाई योग्य ठेवा, असा सल्लाही दिला आहे. तसेच एका युजरने नवीन हेल्मेट घेण्याचा सल्ला दिला आहे.