Viral Photo: मित्राला होती गर्लफ्रेंडची कमी, मैत्रिणीने बेस्ट फ्रेंडला गर्लफ्रेंड शोधण्यासाठी शहरात लावले होर्डिंग; नेटीझन्स म्हणाले, 'हाचं शेवटचा पर्याय होता'
Post for girlfriend (PC - Instagram)

Viral Photo: मित्रांशिवाय जीवनात रस नाही. बेरंग जीवनात फक्त मित्रच रंग भरतात. मग ते सुख असो वा दु:खाचा काळ असो. मित्र नेहमी त्याच्या मित्रासाठी उभा असतो. जर आपल्याकडे काही कमतरता असेल तर मित्रचं ती उणीव पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. नुकतेच, अशाच एका मैत्रिणीने तिच्या बेस्ट फ्रेंड (Best Friends) साठी जे काही केलं त्याची सोशल मीडियावर चर्चा होतं आहे. वास्तविक, एका मुलीने तिच्या बेस्ट फ्रेंडसाठी गर्लफ्रेंड शोधण्यासाठी रस्त्याच्या कडेला होर्डिंग लावले.

गर्लफ्रेंड शोधण्यासाठी लावले होर्डिंग -

होर्डिंगमध्ये एका मुलीने आपल्या मित्रासाठी प्रेयसीचा शोध घेतल्याचा उल्लेख आहे. रिओ असे या मुलाचे नाव असून त्याच्यासाठी मैत्रीण शोधण्याची जबाबदारी त्याची जिवलग मैत्रीण आंचल हिने उचलली आहे. आंचलने रस्त्याच्या कडेला एक मोठे होर्डिंग लावले आहे. ज्यामध्ये ती तिच्या मित्र रिओसाठी गर्लफ्रेंड शोधत असल्याचे लिहिले आहे. (Stunt Viral Video : पोलिसांसमोर स्टंटबाजी नडली, पुढचं चाक उचलून बाईक पळवली...व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरूणावर कारवाई)

आंचलने होर्डिंगमध्ये तिचा मित्र रिओचा फोटोही लावला आहे. त्यानंतर रिओवर कौतुकाचा वर्षाव झाला. मित्राचं कौतुक करताना आंचलने लिहिले आहे की, रिओला शहरातील सर्वोत्तम गोलगप्पाचे दुकान माहित आहे. याशिवाय तो एक चांगला फोटोग्राफर देखील आहे. जी कोणी त्याची मैत्रीण होईल, तिची असंख्य कॅन्डीड फोटो काढली जातील. याशिवाय पार्क स्ट्रीटमध्ये मिळणाऱ्या काठी रोल्सचे तो स्वतःच्या हाताने बनवतो. आंचलने होर्डिंगमध्ये रिओच्या टिंडर खात्याचा क्यूआर कोड देखील शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Calcutta Instagrammers (@ig_calcutta)

या होर्डिंगची पोस्ट @ig_calcutta नावाच्या अकाऊंटवरून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. ही बातमी लिहेपर्यंत लाखो लोकांनी ही पोस्ट पाहिली होती आणि लाईक केली होती. या पोस्टवर मोठ्या संख्येने लोकांनी कमेंटही केल्या आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिले आहे की, 'भाऊ, हा एकच शेवटचा पर्याय शिल्लक होता.' दुसऱ्याने लिहिले, 'देवाने अशी मैत्रिण सर्वांना द्यावी, अशी माझी इच्छा आहे.' तिसऱ्याने लिहिलं, 'आता तुला मुलगी नक्की मिळेल भाऊ.'