Viral Video: मद्यधुंद व्यक्तीची उद्यानातील बेंचमध्ये अडकली मान; पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे वाचला जीव, पहा व्हिडिओ
Drunk Man Viral Video (PC - X/@kanpurnagarpol)

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका मद्यधुंद (Drunk Man) व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. कानपूरच्या रामलीला पार्कमधील बेंचमध्ये एका तरुणाचं डोक अडकलं. यामुळे तो ओरडू लागला. तथापि, मध्यरात्री त्याच्या बचावासाठी पोलिसांनी धाव घेतली आणि त्याची सुटका केली. स्थानिक वृत्तानुसार, तो व्यक्ती दारूच्या नशेत होता आणि झोपेत असताना त्याची मान बेंचमध्ये अडकली.

कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री एक तासापूर्वी एक कॉल आला होता. उद्यानातील बाकाच्या मधोमध एका व्यक्तीची मान अडकल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जेव्हा पोलिस त्या भागात पोहोचले तेव्हा त्यांना मदतीसाठी ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर पोलिस कर्मचारी या व्यक्तीची सुटका करण्यासाठी पुढे सरसावले. काही वेळाने त्या व्यक्तीला वाचवण्यात पोलिसांना यश आले. (हेही वाचा - Bengaluru Bull Attack Video: बैलाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार मरतामरता वाचला; बंगळुरूमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video))

पहा व्हिडिओ -

पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीमुळे या तरुणाची सुटका झाली. या परिस्थितीमुळे घाबरलेल्या व्यक्तीला आधी शांत राहण्याची खात्री पोलिसांना द्यावी लागली. तसेच, पोलिस कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत त्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी केली जाईल याची खात्री केली आणि त्याचे अहवाल स्पष्ट झाल्यानंतरच त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली. पोलिसांमुळे या व्यक्तीचा जीव वाचला.