कोरोना वॉर्डातील डॉक्टरांनी धरला बॉलिवूड गाण्यावर ठेका: व्हायरल व्हिडिओ पाहून हृतिक रोशन म्हणाला, 'मलाही या डान्स स्टेप्स शिकायच्या'
A doctor dance in a COVID ward (PC - ANI)

देशात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची सेवा करण्यासाठी वैद्यकिय कर्मचारी दिवसरात्र एक करत आहेत. कोरोनाग्रस्तांची सेवा करणाऱ्यांना डॉक्टरांना कोरोना वॉरियर्स असे म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीत हे योद्धा कोरोना रूग्णांवर जीव धोक्यात घालून उपचार करीत आहेत. अनेक डॉक्टर कोरोना संक्रमितांना तणावमुक्त ठेवण्यासाठी वेगवेगळ्या युक्ता करत आहेत. अशातचं कोरोना रुग्णालयातील अनेक व्हिडिओ सध्या समोर येत आहेत. आसाममध्ये (Assam) सिलचर मेडिकल कॉलेजमधील (Silchar Medical College) एका डॉक्टरने कोविड वॉर्डात (COVID Ward) बॉलिवूड गाण्यावर डान्स केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डॉक्टर पीपीई किट परिधान करुन बॉलिवूड गाण्यावर नाचताना दिसत आहे.

डॉक्टरांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटीझन्सनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा देखील समावेश आहे. ज्या डॉक्टरच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याचे नाव अरुप सेनापती असे आहे. हृतिक रोशनने आपल्या ट्विट अकाऊंटवरून या डॉक्टरचा व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना हृतिकने 'मला त्यांच्या डान्स स्टेप्स शिकायच्या आहेत,' असं म्हटलं आहे. (हेही वाचा - Viral Video: 'बाबा का ढाबा' नंतर आता फरीदाबादमधील भेलपुरी विकणाऱ्या 86 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा भावनिक व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडिया युजर्सने केली 57 हजार रुपयांची मदत)

दरम्यान, कोरोना बाधित रूग्णांना तणावमुक्त ठेवण्यासाठी डॉक्टर त्यांच्याबरोबर नासताना किंवा त्यांच्यासमोर नाचताना पाहण्याची ही पहिलीचं घटना नाही. यापूर्वी सोशल मीडियावर कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या अनेक डॉक्टरांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओला नेटीझन्स चांगला प्रतिसाद देत असून डॉक्टरांचं कौतुक करीत आहेत.