Yusaku Maezawa (PC- Instagram)

जपानमधील एका अब्जाधीशाने अनोख्या सामाजिक प्रयोगाची घोषणा केली आहे. या अब्जाधीशाने पैसे वाटण्याची भन्नाट योजना आखली आहे. युसाकू माइजावा, (Yusaku Maezawa) असे या अब्जाधीशाचे नाव आहे. जपानमधील फॅशन जगतातील दिग्गज व्यक्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत. पैसे मिळाल्यामुळे लोकांच्या आनंदात वाढ होते. या आनंदाचे मोजमाप करण्यासाठी ही योजना आखण्यात आली असल्याचे माइजावा यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत सीएनएन या इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिलं आहे.

माइजावा आपल्या संपत्तीतील 90 लाख डॉलर 1 हजार फॉलोअर्सला वाटणार आहेत. जे फॉलोअर्स माइजावा यांचे 1 जानेवारीचे ट्विट रिट्विट करतील. त्यांच्यामधून रँडम पद्धतीने या 1 हजार फॉलोअर्सची निवड करण्यात येईल. तसेच या फॉलोअर्संना पैसे मिळाल्यानंतर काय उपयोग झाला आणि त्यांच्या आनंदात किती भर पडली याबद्दलही सर्वेक्षण केले जाणार आहे. (हेही वाचा - अहो आश्चर्यम! चक्क हेल्मेट घालून कुत्र्याने केला दुचाकीवरून प्रवास; सोशल मीडियावर Video व्हायरल)

दरम्यान, युसाकू यांनी हा अत्यंत गंभीर सामाजिक प्रयोग असल्याचे म्हटले आहे. तसेच या प्रयोगामध्ये शिक्षण तज्ज्ञांनी आणि अर्थतज्ज्ञांनीदेखील सहभागी व्हावे, असे आवाहनही युसाकू यांनी केले आहे. युसाकू हे नावाजलेले उद्योजक आहेत. तसेच ते एलन मस्क च्या स्पेसएक्स विमानात बसून चंद्राची सफर करणारे जगातील पहिले खासगी आंतराळवीरही आहेत. युसाकू हे नेहमी सोशल मीडियावर  विविध सामाजिक घटनांवर भाष्य करत असतात. रिट्विट करणाऱ्यांना पैसे वाटण्याचा प्रयोगही सामाजिक असल्याचं युसाकू यांनी स्पष्ट केलं आहे.