बोरम (Photo credit : Facebook)

दक्षिण कोरियामधील (South Korea) सहा वर्षांच्या अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त यू ट्यूबरने (YouTuber), तब्बल 8  दशलक्ष डॉलर्स (55 कोटींपेक्षा जास्त किंमतीची) मालमत्ता खरेदी केली आहे. बोरम (Boram) असे या मुलीचे नाव असून, आपल्या 30 दशलक्ष यूट्यूब चाहत्यांच्या जोरावर तिने ही मालमत्ता विकत घेऊ शकली आहे. गंगनमच्या पॉश सियोल उपनगरातील 258-स्क्वेअर मीटर (2,770-चौरस फूट) भूखंडावर, तीने पाच मजली इमारत खरेदी केली. फक्त विविध खेळण्यांचे रिव्ह्यू करून बोरमने इतके चाहते आणि पैसे मिळवले आहेत.

साउथ चीन मॉर्निंग पोस्टच्या मते, तिच्या यूट्यूब चॅनेलमधून तिला अंदाजे 21 लाखाहून अधिक मासिक उत्पन्न मिळते. बोरमच्या अनेक यूट्यूब क्लिप्सना 300 दशलक्षाहूनही जास्त वेळा पाहिले गेले आहे. सोशल मीडियावर ही चिमुकली फार प्रसिद्ध आहे. खासकरून लहान मुलांमध्ये बोरम फार लोकप्रिय आहे. 2017 मध्ये, सेव्ह द चिल्ड्रन यांनी बोरमचे काही वादग्रस्त व्हिडीओ पोलिसांना दाखवले होते. त्यानंतर बोरमच्या पालकांना बाल शोषण रोखण्यासाठी एक सल्लागार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. (हेही वाचा: YouTube च्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांमध्ये 8 वर्षांचा मुलगा अव्वल; व्हिडीओज बनवून कमावले तब्बल 155 कोटी)

तिचे चॅनेल, Boram Tube Vlog आणि Boram Tube ToysReview यांनी अनुक्रमे 17 दशलक्ष आणि 13 दशलक्ष चाहते प्राप्त करून बढाई मारली आहे. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचे करिअर व्यवस्थापित करण्यासाठी बोरम फॅमिली कंपनीची स्थापना केली. दरम्यान, फोर्ब्स मासिका (Forbes Magazine)ने 2017 ते 2018 या दरम्यान यूट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची यादी जाहीर केली होती. या यादीत पहिले स्थान पटकावले आहे ते एका 8 वर्षाच्या मुलाने. रायन (Ryan) असे या मुलाचे नाव असून, त्याने गेल्या वर्षभरात यूट्यूबवरील व्हिडीओजच्या माध्यमातून 22 मिलियन डॉलर्स (1,55,13,30,000 रुपये) कमावले आहेत.