नांदेड (Nanded) येथील सहाय्यक लेखाधिकारी सतिष पंजाबराव देशमुख (Satish Deshmukh) यांनी लिहलेल्या पत्राची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या पत्रातून सतीष यांनी पाठिच्या दुखण्यामुळे घोडा खरेदीची व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. मात्र, ही मागणी मागे घेत सतीष यांनी माफीनामा सादर केल्याची माहिती नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली आहे. हे पत्र 3 मार्च रोजी लिहिण्यात आले आहे. तसेच या पत्राची एक प्रत रोहयोच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्याचेही पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्वाचे म्हणजे, पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात बसून येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय वैद्यकीय अधिष्ठातांनी दिले आहे. वैद्यकीय अधिष्ठातांनी दिलेल्या अभिप्राय जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आला आहे. त्यानंतर सतिष देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केला आहे. हे देखील वाचा- Mumbai Power Outage: 'मुंबईमध्ये मागच्यावर्षी वीज जाणे ही मानवी चूक होती, सायबर हल्ल्याचे कोणतेही पुरावे नाहीत'- Union Power Minister RK Singh
पत्र-
"उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की, मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होतो. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरविले आहे. घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल व घोडा आणल्यास त्याला बांधण्यासाठी कार्यालयीन परिसरात परवानगी देण्यात यावी, ही विनंती ” असा मजकूर असलेले पत्र त्यांनी लिहले होते.