Photo Credit- X

Pune Zika Virus Update: पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे पुणेकरांची (Punekar) चिंता वाढली आहे. नव्या आकडेवारूनुसार पुण्यामध्ये झिका व्हायरस (Zika Virus) वेगाने पसरत असल्याचे दिसत आहे. झिका व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे. त्यामुळे पुणेकरांचे टेन्शन वाढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. एरंडवणे भागात झिकाचा रुग्ण आढळून आला आहे. (हेही वाचा: Zika Virus Causes, Symptoms, Prevention: झिका व्हायरस म्हणजे काय? जाणून घ्या डासांपासून होणार्‍या या आजाराची लक्षणं, उपचार आणि कधी घ्याल डॉक्टरांचा सल्ला!)

एरंडवणे येथे राहणाऱ्या ३८ वर्षांच्या व्यक्तीला झिकाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील झिकाच्या रुग्णांची संख्या १६ वर पोहचली आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांमध्ये ११ महिलांचा समावेश आहे. यामध्ये गर्भवती महिला देखील आहेत. तज्ञांच्यामते गर्भवती महिलांना झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे. झिकाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महानगर पालिकेचे टेन्शन वाढले आहे. पालिकेने पुणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.याबाबत पालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहेत. पालिकेकडून झिकाची लक्षणं दिसणाऱ्या नागरिकांच्या रक्ताच्या नमुण्यांची तपासणी केली जात आहे.