गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या 18 वर्षीय मुलाचा मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

गोदावरी नदीत (Godavari River) पोहण्यासाठी गेलेल्या एका 18 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निफाड तालुक्यातील ही घटना असून विजय जाधव असे मुलाचे नाव आहे.

रविवारी सकाळी दररोजच्या वेळेनुसार विजय हा मित्र आणि नातेवाईकांसोबत पोहायला गेला होता. त्यावेळी पोहत असताना पाठीला लावण्यात आलेला गट्टू विजयच्या पाठीवरुन निघाल्याने तो बुडाला. या प्रकरणी आपत्ती व्यवस्थापनाने विजयचा शोध घेतल्यानंतर मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला.(मुरुड येथे पॅरासेलिंग करताना दोरी तुटून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी)

तत्पूर्वी गेल्या आठवड्यात सुद्धा दोन तरुणांचा बुडूनच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर आता विजयचा सुद्धा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने सर्वत्र दु:ख व्यक्त केले जात आहे.