मुरुड येथे पॅरासेलिंग करताना दोरी तुटून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

अलिबाग (Alibgah) मधील मुरुड (Murud) येथे फिरण्यासाठी आलेल्या 15 वर्षीय मुलाचा पॅरासेलिंग (Parasailing) करताना दोरी तुटून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर मुलाचे वडील यांना गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्याच येत आहे. या प्रकरणी पॅरासेलिंग चालकाच्या विरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुण्यात राहणारे गणेश पवार हे कुटुंबासोब अलिबाग येथे फिरण्यासाठी आले होते. त्यावेळी समुद्राच्या येथे खेळण्यात येणाऱ्या वॉटरस्पोर्टसाठी त्यांनी पॅरासेलिंग करण्याचे ठरविले. तर पॅरासेलिंग करताना पॅराशूटने उंच झेप घेताच त्याची दोरी अचानक तुटली. यामध्ये पॅरा सेलिंग करणारे दोघेही खाली पडले असता मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.(मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई कॉलनीत इमारतीचा स्लॅब कोसळला; दोन जखमी)

तर गणेश पवार हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुरुड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुशे पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.