इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोन नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई ( Mumbai) शहरातील घाटकोपर (Ghatkopar) येथील रमाबाई कॉलनी (Ramabai Colony) येथील इमारतीत घडला. इमारतीचा स्लॅब नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला. ही घटना घडली तेव्हा इमारतीत नेमकी किती लोकं होती. याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न मोठा आहे. अशा इमारतींची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या इमारतींवर कारवाई करत त्या एकत पाडाव्यात किंवा त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी वारंवार होते. परंतु, इमारतीत राहात असलेल्या नागरिकांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित होत असल्याने अनेकदा या इमारतींची डागडूजी टाळली जाते, त्यामुळे या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (हेही वाचा, Mumbai Dangerous Bridge: नव्याने झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळले 15 धोकादायक पूल; जाणून घ्या यादी)
एएनआय ट्विट
Mumbai: Two people injured after a portion of a building collapsed in
Ramabai Colony, Ghatkopar (East), today. More details awaited. #Maharashtra
— ANI (@ANI) May 25, 2019
दरम्यान, इमारतीचा स्लॅब नेमका कोणत्या कारणामुळे कोसळला. ही घटना घडली तेव्हा इमारतीत नेमकी किती लोकं होती. याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, उपचारासाठी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.