बेरोजगारीच्या मुद्द्यावरून युवा काँग्रेस आक्रमक; मोदी सरकारचे युवकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा केला आरोप
Satyajeet Tambe | Photo Credits: Twitter

बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्यावरून अनेक राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केली आहे. याच मुद्यावरून युवा काँग्रेस पक्षांनी (Youth Congress) आता आक्रमक भुमिका घेतली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यात कोरोना महामारीने आणखी भर घातल्याचे दिसत आहे. देशात बेरोजगार तरुणांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. तरुणांच्या हातांना काम नसल्याने कुटुंबाला पोसायचे कसे? या चिंतेने त्यांचे नैराश्य वाढत आहे. तरुणांना रोजगार मिळालाच नाहीतर, देशाची अर्थव्यवस्थादेखील रसातळाला जाईल. परंतु, मोदी सरकार तरुणांच्या वाढत्या बेरोजगारीकडे जणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप युवा काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

युवाकांना रोजगार मिळावा, यासाठी युवा काँग्रेसने रोजगार दो अभियानाची सुरुवात केली होती. युवा काँग्रेसने पक्षाचा स्थापना दिन 9 ऑगस्ट रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेची सुरुवात केली होती. तसेच देशात 13.5 कोटी जण बेरोजगार आहेत. यासाठी सरकारला जाग यावा म्हणून युवा काँग्रेसने नेहमी अग्रेसर भुमिका घेतली आहे, असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता पवन खेडा यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- पुणे: महाराष्ट्रातील सर्व मंदिरं, धार्मिक स्थळं सुरु करण्यासाठी भाजपचे राज्य सरकार विरोधात घंटानाद आंदोलन

सत्यजीत तांबे यांचे ट्विट-

सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जेईई, नीट च्या प्रवेश परीक्षा पुढे ढकल्याबाबत आय़कर भवन कार्यालयाच्या आवारात आज आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकट काळात जीईई, नीट प्रवेश परीक्षा पुढे ढकलणे अपक्षित आहे. अशा गंभीर परिस्थितीत परीक्षा घेण्याचा घाट मोदी सरकार घालत आहे. मोदी सरकारमधील शिक्षण खाते विद्यार्थ्यांच्या जीवाचा खेळ मांडू पाहत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत.