Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Suicide News:  छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका कुटूंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडकीस आली आहे. दीड लाखाच्या कर्जासाठी १५ वर्षात तीन जणांनी आयुष्य संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षापूर्वी आजोबांनी घेतलेले कर्ज तीन पिढ्यानाही फेडता आले नाही. घरातील तिघांनी आत्महत्या केल्याने गावात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. सिल्लोड येथील हे कुटूंब राहत होत.

मिळालेल्या माहिती नुसार, १५ वर्षांपूर्वी आजोबांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड झाली नाही त्यामुळे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातीली शेतकऱ्याने आत्महत्या केली. सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावात ही घटना घडली. सोमनाथ असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या आधी सोमनाथच्या भावाने आणि वडिलांनी याच कर्जासाठी आत्मत्या केली.  त्यानंतर कुटुंबाची जबाबदारी सोमनाथवर येऊन पडलेली होती. कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असल्याने त्याची परतफेड कशी करावी या चिंतेने गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. याच तणावातून सोमनाथ पंडित भोसले याने घराजवळील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

खाजगी फायनान्स कंपनीकडून सोमनाथच्या आजोबांनी कर्ज घेतले होते. मात्र त्याची परतफेड होत नसल्याने भोसले कुटुंबातील तिघांना आत्महत्या करावी लागली आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावात मोठी खळबळ उडाली.