Year Ender 2022- Political | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

सन 2022 या वर्षातील शेवटच्या महिन्यातील आज पहिला दिवस आहे. म्हणजे आजपासून अवघ्या 30 दिवसांनी हे वर्ष समाप्त (Goodbye 2022) होईल. या वर्षाची जागा नवे वर्ष (Welcome 2023 ) म्हणजेच 2023 घेईल. नव्या वर्षाचे स्वागत करताना सहाजिकच सरत्या वर्षाची उजळणी होईल. कोरोना नंतरचे स्थिरस्थावर होणारे वर्ष. ही या वर्षाची प्रमुख ओळख. असे असले तरी या संपूर्ण वर्षातही काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या. ज्याचा या वर्षाच्या अखेरीस नक्कीच आढावा घ्यावा लागेल. यातील काही आपल्याला आनंद देणाऱ्या आहेत. तर काही मात्र चटका लावणाऱ्या. चला तर.. जाणून घेऊया 2022 या वर्षातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा (Year Ender 2022) हा आढावा.

काग्रेसला 25 वर्षांनी मिळाला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष

प्रदीर्घ काळ काँग्रेस अध्यक्ष पदावर राहिलेले गांधी घराणे 25 वर्षांमध्ये प्रथमच स्वत:हून बाजूला गेले. यंदा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुका पार पडल्या. या निवडुका अत्यंत पारदर्शी आणि गांधी घराण्याच्या प्रभावातून बऱ्यापैकी बाहेर पडत झाल्या. शशी थरुर आणि मल्लिकार्जून खर्गे हे यांच्यात लढत झाली. मल्लिकार्जून खडगे यांनी बाजी मारली. पाठिमागील 25 वर्षांमध्ये प्रथमच काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष मिळाला.

राहुल गाधी यांची भारत जोडो यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथून काढलेल्या भारत जोडो यात्रेची जगभरात दखल घेतली जात आहे. ही यात्रा कन्याकुमारी ते जम्मू-कश्मीर असा प्रवास करणार आहे. विशेष म्हणजे ही यात्रा पायी निघाली असून, देशभरातील बहुतांश राज्यातून ही यात्रा निघाली आहे. या यात्रेला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतो आहे. या यात्रेची जगभरातून दखल घेतली जात आहे. या वर्षातील ही एक महत्त्वाची आणि मोठी घडामोड मानली जात आहे. (हेही वाचा, Year Ender 2022: राजकारणापासून ते मनोरंजनापर्यंत, 2022 या वर्षात घडलेल्या देशातील काही महत्वाच्या मोठ्या घटना, जाणून घ्या सविस्तर)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेशी तडजोड

सन 2022 च्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यात्रेबाबत तडजोड झाल्याची घटना पाहायला मिळाली. एक जानेवारीला वैष्णौ माता मंदिरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 12 लोकांचा मृत्यू झाला. 5 जानेवारी रोजी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी त्यांच्या सुरक्षाताफ्यात मोठी चूक झाल्याचे जगासमोर आले. शेतकऱ्यांनी पंतप्रधानांचा ताफआ रोकला. पंतप्रधानांना दौरा अर्धवट सोडून परत यावे लागले. पंतप्रधानांचा ताफा थांबला तेथून पाकिस्तानची सीमा केवळ 20 किलोमीटर दूर होती.

पाच राज्यांतील निवडणूक नकाल

सन 2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले होते. या सर्व राज्यांममध्ये सत्ताधाऱ्यांना आव्हान होते. त्यामुळे परिवर्तन होणार का याबाबत देशभरात उत्सुकता होती. मात्र, काही राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांनीच सत्तावापसी केली. तर काही ठिकाणी विरोधकांना संधी मिळाली. आपने पंजाबमध्ये पहिल्यांदाच मुसंडी मारली.

महाराष्ट्र, बिहारमध्ये नाट्यमय सत्तांतर

महाराष्ट्र आणि बिहारमध्ये नाट्यमयरित्या सत्तांतर पाहायला मिळाले. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडी एकनाथ शिंदे यांनी शिवसनेत केलेल्या बंडामुळे कोसळले. तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजपसोबतच्या युतीचे सरकार पडले आणि पुन्हाएकदा नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखलीच राष्ट्रीय जनता दलासोबत नवे सरकार अस्तित्वात आले.

याशिवाय गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेते विक्रम गोखले यांच्यासारख्या प्रतिभावंत कलावंताचे निधन झाले. तर पुढ निलंबीत करणया आलेल्या तत्कालीन भाजप प्रवक्ता नृपूर शर्मा यांच्या पैगंबरांवरील विधानामुळे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पडसादही याच वर्षात उमटले.