Uran Murder Case: रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येप्रकरणातील आरोपी दाऊद शेख (२४) याला अटक करण्यात आले आहे. नवी मुंबईतील क्राइम ब्रॅंचने आरोपीला अटक केले. यशश्रीची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी आरोपीला कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील शाहपूर टेकडी परिसरातून ताब्यात घेतले. पोलिसांना माहिती मिळताच, यंत्रणा कामाला लागली. (हेही वाचा-यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांचा पोलीस स्थानकावर मोर्चा; मारेकऱ्याला ताब्यात देण्याची केली मागणी)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेला २०१९ पासून ओळखत होता. आरोपीला एकदा अटक करण्यात आली होती. पीडितेच्या वडिलांनी दाऊद शेखविरुध्द लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. सुमारे सहा महिने तुरुंगात राहिल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि नंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला आणि तिथे त्याने बस चालक म्हणून काम केले. प्रेम त्रिकोणामुळे दोघांमधील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मुलगी दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आली होती आणि त्यामुळे तो चिडला होता.
#Dawood Shaikh accuse in #Yashashree Shinde #Murder case
arrested from #Karnataka's Gulbarga. The victim, had been reported missing, and her body was found dumped in the bushes near a railway station in Navi Mumbai's #Uran on #Saturday. #loveisland pic.twitter.com/y8Pn8UFl3v
— Shreerang (@shreerangkhare) July 30, 2024
यशश्री शिंदेच्या हत्यानंतर आरोपी फरार होता. पोलिसांना माहिती मिळताच, आरोपीचा शोध सुरु केला. अखेर मंगळवारी पोलिसांनी त्याला पकडले. कर्नाटकातील शाहपूरा येथून त्याला अटक केले. क्राइम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॉल रेकॉर्डनुसार, शेख २२ जुलै रोजी उरणाला आला आणि २५ जुलै पासून त्याचा फोन बंद झाला. यशश्री शिंदे हीच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. त्यामुळे या घटनेचा तपास करत आहे.
यशश्रीच्या हत्येपूर्वी दाऊद तिचा पाठलाग करत असल्याचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घटनास्थळावरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहे.