पोटची मुलगी हवी म्हणून तीन वर्षाच्या मुलीचे नातेवाईंकाकडून अपहरण
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

पोटची मुलगी हवी म्हणून महिलेने जावेमार्फेत तिच्या बहिणीच्या मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर आरोपींना पोलिसांकडून बेड्या ठोकल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी एक महिला तिच्या तीन वर्षीय मुलीला घेऊन भायखळा रेल्वे स्थानकाजवळ बहिणीची वाट पाहत होती. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्या मुलीला पळवून नेले. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिसांकडे जाण्यापूर्वी शोधाशोध केली. मात्र मुलगी सापडली नसल्याने तिने पोलिसांकडे धाव घेत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.

या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटिव्ही मधील छायाचित्रे पाहिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हैद्राबाद येथील एका आरोपी महिलेला पकडले असून ती मुलगी तिच्याकडे मिळाली आहे. तसेच महिलेने पोटची पोरगी नसल्याने हे अशा पद्धतीने अपहरण केल्याचे कबुल केले आहे.