Representative Image (Photo Credits: File)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस बदलत जाणारे गुन्हेगारीचे स्वरुप आता नवीनतम टेक्नोलॉजी मुळे अधिकच गंभीर होत चालले आहे. या टेक्नोलॉजीच्या माध्यमातून पुण्यात एका धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जेथे तरुणींनी 8 पुरुषांसोबत व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) केलेले अश्लील व्हिडिओ कॉल्स रेकॉर्ड (Whatsapp Video Calls) करुन पुरुषांना ब्लॅकमेल केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत या पुरुषांनी पुणे सायबर विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर या तरुणींचा तपास सुरु आहे. TOI ने दिलेल्या माहितीनुसार, ब्लॅकमेल (Blackmail) करण्यात आलेले पुरुष हे 25 ते 40 वयोगटातील असून यातील काही शालेय शिक्षण, पगारदार कर्मचारी आहेत.

TOI ने दिलेल्या माहितीनुसार, या पुरुषांची सोशल मिडियावर या तरुणींशी ओळख झाली. त्यानंतर त्यांची हळूहळू मैत्री होऊन एकमेकांच्या फोन नंबर्सची देवाणघेवाण झाली. त्यानंतर कॉल्स वाढत जाऊन व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल सुरु झाले. यात या तरुणींनी न्यूड होऊन या पुरुषांनी गप्पा मारण्यास सुरुवात केली. पण त्यासोबतच हे तरुणींनी हे व्हिडिओ कॉल्स रेकॉर्डसुद्धा करत होत्या. मग त्याच रेकॉर्ड व्हिडिओजचा फायदा घेऊन या तरुणींनी त्यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.

हेदेखील वाचा- वसईमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशमधील 25 वर्षीय तरुणाला अटक

त्यानंतर काहींनी तर त्या मुलींना पैसे देखील दिले होते. 5000 ते 20,000 रुपयांची मागणी करुन जर पैसे दिले नाही तर तुमची हे व्हिडिओ दाखवून बदनामी करु असे त्या तरुणींकडून धमक्या येऊ लागल्या. अखेर या पुरुषांनी सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यांनी दिेल्या माहितीवरुन या तरुणींचा तपास सुरु आहे.

या तरुणींनी त्यांना सोशल मिडिया साइटवर शोधून त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. या मैत्रीत एकमेकांसोबत व्हॉट्सअॅप द्वारा बोलणे, व्हिडिओ कॉल्स करणे हे प्रकार वाढू लागले. या व्हिडिओ कॉल्स मध्ये न केवळ तरुणी नग्न झाल्या तर त्यांनी या पुरुषांना देखील न्यूड होण्यास सांगितले. मात्र या तरुणींनी चलाखीने हे सर्व व्हिडिओ कॉल्स रेकॉर्ड केले. जेणेकरुन त्यांना नंतर ब्लॅकमेल करण्यात येईल. आणि तोच प्रकार या तरुणींनी सुरु केला.