भारतासमोर कोरोना विषाणूचे (Coronavirus) महासंकट उभं असताना देशातील विविध ठिकाणी बलात्काराच्या (Rape) धक्कादायक घटनांची पुनरावृत्ती सुरूचं आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर देशात अनेक ठिकाणी बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. अशातचं आता पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये (Vasai) एका गतिमंद मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशमधील 25 वर्षीय तरुणाला अटक केली आहे.
पीडितेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याशी ओळख वाढवून वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुकेश असं या आरोपीचं नाव असून तो वसईतील देवतलाव येथील लाकडाच्या वखारीमध्ये राहतो. दरम्यान, आरोपी मुकेशची वसईतील एका मुलीशी ओळख झाली होती. त्यानंतर या दोघांमध्ये फोनद्धारे संवाद होत असे. आरोपीने त्यानंतर अनेक वेळा पीडितेला भेटण्यासाठी बोलावले. यावेळी त्याने पीडिसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. (हेही वाचा - मुंबई: कोंबडीचे यकृत खरेदी करण्याऐवजी चॉकलेटवर 10 रुपये खर्च केल्याने महिलेने 6 वर्षाच्या भाचीच्या खासगी भागावर दिले गरम चमच्याने चटके)
त्यानंतर पीडित मुलगी मुकेशपासून गर्भवती झाली. ही घटना पीडितेच्या कुटुंबीयांना समजली. पीडितेच्या कुटुंबियांनी वसई पोलिस ठाण्यात मुकेशविरोधात बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार नोंदवली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुकेशला अटक केली आहे.
दरम्यान, रविवारी पालघर जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पीडितेने आत्महत्या केली होती. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. बलात्कार झाल्यानंतर पीडित तरुणीनीने पोलिस स्टेशन गाठलं. परंतु, पोलिसांनी पीडितेची तक्रार दाखल करून घेतली नाही. तिला अपमानास्पद वागणूक दिली. त्यानंतर तिने घरी जाईन गळफास घेतला, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.