
संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाशी झुंज देत असताना पालघर (Palghar) जिल्ह्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका 21 वर्षीय विवाहित महिलेची हत्या (Murder Case) करून तिचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये लपवल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह सासरच्या 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बोईसर (Boisar) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश नगर परिसरातील ही घटना आहे. धक्कादायक म्हणजे, फेब्रुवारी 2019 मध्ये हत्या करण्यात आली असून तब्बल दीड वर्षानंतर या महिलेचा सांगाडा स्थानिक पोलिसांच्या हाती लागला आहे. हुंडाबळीची तक्रार मागे न घेतल्याने ही हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
बुलबुल झा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. बुलबुलचे गेल्या काही वर्षापूर्वी दीपक झासोबत लग्न झाले होते. तसेच सासू बच्चू देवी झा, सासरा पवन झा आणि तिची नंणंद नीतू यांच्यासोबत ती बोईसर येथील गणेश नगरमधील एका खोलीत भाड्याने राहत होती. लग्नानंतर सासरचे लोक बुलबुलला हुंड्यासाठी मारहाण करायचे. एवढेच नव्हेतर, 2017 मध्ये त्यांनी एकदा बुलबुलला पेटवून दिले होते. त्यावेळी या चौघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. काही दिवस हे सर्वजण तुरुंगात होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा बुलबुलला त्रास देण्यास सुरुवात केली होती.
संपूर्ण कुटुंब काही दिवसांनतर घराला कुलूप लावून बिहारला निघून गेले. तसेच ते घरमालकाला ऑनलाइन पैसे पाठवून घरभाडे देत असे. मात्र, लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून पैसे पाठवले नाहीत, म्हणून घरमालकाने बुलबुलच्या फोनवर संपर्क साधला. मात्र, तिचा फोन बंद होता. त्यानंतर घरमालक भाडे घेण्यासाठी गणेशनगरला गेले. परंतु, त्यांची खोली बंद होती. घर वर्षभरापासून बंद आहे, असे आजूबाजूच्या लोकांनी घरमालकाला सांगितले. घरातून दुर्गंधी येत असल्याने घरमालकाने पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यांनी बाथरुममधील ड्रम बाहेर काढला. त्यात एका महिलेचा सांगाडा होता. बुलबुलची हत्या करून चौघेही बिहारला पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे. चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांचे एक पथक त्यांना अटक करण्यासाठी बिहारला रवाना झाले आहे.हे देखील वाचा- धक्कादायक! मोठ्या भावाने हातातील समोसा हिसकावून घेतला म्हणून 11 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; नागपूर येथील घटना
भारतात हुंडा पद्धतीवर किंवा प्रथेवर आळा बसावा यासाठी शासनाने हुंडा विरोधात 1961 ला हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला आहे. 1961 हुंडा प्रतिबंद कायद्यानुसार, कलम 3, कलम 4 अन्वये विविध शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, या कायद्याकडे दुर्लक्ष होऊन आज 21 व्या शतकात हुंडापद्धत अबाधित आहे. हे खून भयानक वास्तविक नाकारता येणार नाही. दरम्यान, अनेक महिला हुंडाबळीच्या शिकार झाल्या आहेत.