Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

Maharashtra Shocker: फुलंब्री (Phulambri) तालुक्यात रविवारी गर्भपाताच्या गोळ्या (Abortion Pills) खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, तिच्या पतीने तिला गोळ्यांचा ओव्हरडोज (Overdose) दिला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

न्यूज18 लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मृत वैशाली क्षीरसागर हिचे नुकतेच बाळासाहेब क्षीरसागर यांच्याशी लग्न झाले. वैशाली गरोदर होती. मात्र, पतीला मूल नको होते. गर्भपात करण्यासाठी आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्यांचा डोस दिला. दुर्दैवाने, गोळ्यांचे ओव्हरडोजमुळे महिलेचे रक्त कमी झाले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Thane: ठाण्यात अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायात ढकलल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल)

यासंदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली असून आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आली आहे. तसेच आरोपी पतीविरोधात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेने आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - Gang Rape in Mumbai Case: सामुहिक बलात्काराच्या घटनेनं मुंबई पुन्हा हादरली; 15 वर्षीय मुलीवर मित्रासह 6 जणांकडून बलात्कार)

अशाच एका घटनेत, 13 डिसेंबर रोजी बेंगळुरूमधील एका 33 वर्षीय महिलेचा गर्भपाताची गोळी घेतल्याने मृत्यू झाला होता. प्रिती कुशवाह असे या महिलेचे नाव असून ती शहरातील एका ई-कॉमर्स फर्ममध्ये सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशवाह यांनी शनिवारी न्यू मायको लेआउट येथील तिच्या घरी गर्भधारणा चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. मुलगा अवघ्या 11 महिन्यांचा असल्याने तिला दुसरे मूल होऊ नये म्हणून तिने गोळ्या घेतल्या.