पुणे जिल्ह्यात 55 नव्या COVID-19 रुग्णांसह 3 कोरोना बाधितांचा मृत्यू, कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 1319
Coronavirus (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस ने अक्षरश: धुमाकूळ घातला असून राज्यात सद्य स्थितीत एकूण 8068 रुग्ण आढळले आहेत. तर 342 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ही संख्या धक्कादायक असून राज्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण असलेल्या मुंबईपाठोपाठ पुण्यात देखील कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यात 55 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 3 नवे रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामुळे पुण्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1319 इतकी झाली असून एकूण 80 रुग्ण दगावले आहेत.

तर मुंबईत कोरोना बाधितांची एकूण संख्या 6343 वर पोहोचली असून 223 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ पुण्यात 1128 कोरोना बाधितांची एकूण संख्या झाली आहे. महाराष्ट्रातील Coronavirus संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी, आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर

दरम्यान भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 27,892 वर पोहोचली असून 872 रुग्ण दगावले आहेत. तर 6185 बरे झाले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या भारतात 20, 835 रुग्णांवर उपचार सुरु आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. भारतात गेल्या 24 तासांत 1396 नवे रुग्ण आढळले असून 48 रुग्ण दगावले आहेत.

Maharashtra COVID-19 Update : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा लवकरच ८ हजाराच्या घरात पोहचणार - Watch Video 

जगभरात कोरोना बाधितांची संख्या 29 लाखांच्या वर पोहोचली असून अमेरिकेत अक्षरश: या विषाणूने थैमान घातले आहेत. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 1,330 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 9 लाखांच्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.